राजकारणातील संयमी नेतृत्व हरपले...

महेश सोरटे
Monday, 31 August 2020
  • भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे दुःखद निधन झाले.
  • त्यांच्या रूपाने अत्यंत कर्तृत्ववान, थोर वैचारिक,प्रगल्भ बुद्धिमत्ता, मितभाषी आणि संयमी असलेले अर्थतज्ञ, असे महान राजकीय नेतृत्वास देश मुकला आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या रूपाने अत्यंत कर्तृत्ववान, थोर वैचारिक,प्रगल्भ बुद्धिमत्ता, मितभाषी आणि संयमी असलेले अर्थतज्ञ, असे महान राजकीय नेतृत्वास देश मुकला आहे.

गेली पाच दशके भारताचे आणि पर्यायाने आपल्या देशाच्या विकासाचे राजकारण जवळून पाहणाऱ्या आणि वेगवेगळी पदे उपभोगलेल्या आदर्श राजकारण्यांपैकी एक होते. देशाच्या विकास आणि उन्नतीसाठी त्यांनी दिलेले अनमोल योगदान सदैव स्मरणात राहील. संपूर्ण देश तुम्हाला कधीच नाही विसरणार. प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज प्रणव मुखर्जी यांचे उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र अभिषेक मुखर्जी यांनी ट्विटवर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझे वडील प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे. आर आर रुग्णालयातील डॉक्टरांनी माझ्या वडिलांनी वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना केली होती. याबद्दल मी सर्वांचे मी आभार मानतो...

मुखर्जी हे लवकर बरे व्हावेत यासाठी पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी किरनहर येथे प्रार्थना करण्यात आली होती. गावातील नागरिकांनी मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी ७२ तासांचा यज्ञ सुरू केला होता. या पूजेत मुखर्जी यांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. मुखर्जी हे नित्यनेमाने दरवर्षी दुर्गापूजेसाठी किरनहरला भेट देत असत. किरनहरपासून काही किलोमीटर अंतरावर मुखर्जी यांच्या पूर्वजांचे गाव मिरीती आहे. तेथेही मुखर्जी यांचे कुटुंबीय पूजा करीत होते. 

भावपूर्ण श्रद्धांजली...

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News