हटके दिसायचं? तर,  हेअरस्टाइल हवी स्टायलिशच..!

विराज पवार
Saturday, 3 August 2019
  • केस कापायचे आहेत..? कापा हो, तुम्हाला हवे तसं... असे बोलण्याचे दिवस आता संपलेत. पिक्‍चर गाजला की, त्या हिरोची हेअरस्टाइल तरुणाईच्या डोक्‍यावर दिसेना तर नवलच.

केस कापायचे आहेत..? कापा हो, तुम्हाला हवे तसं... असे बोलण्याचे दिवस आता संपलेत. पिक्‍चर गाजला की, त्या हिरोची हेअरस्टाइल तरुणाईच्या डोक्‍यावर दिसेना तर नवलच. कोणाचा बॉक्‍स, कोणाचा वनसाइड, कोणाचा आर्मकट, त्याला सोबतीला हेअर कलरचा रंगबेरंगी "स्पाइस, फंकी'ही आजच्या तरुणाईला स्टायलिश बनवत आहेत. 

"कंगी घुमाके उल्टा टोपी टिका के, स्टाइल मैं रेहने का,' हे गीत आता तरुणाईची लाइफस्टाइलच बनले आहे. या स्टाइल असतात त्या कोणत्या ना कोणत्या पिक्‍चर आणि मालिकांतील. त्यातील नायक असोकी खलनायक. त्याने करेल ती स्टाइल तरुणाईत हिट होते. सलमान खानचा "तेरे नाम', अमीर खानचा "गझनी', हनी सिंग, शाहिद कपूर, रणवीर सिंग, वरुण धवन, शाहरूख खान, टायगर श्रॉफ, टॉलिवूड अभिनेते अल्लू अर्जुन, यश तसेच विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन आदी क्रिकेटरच्या स्टाइलही तरुणांना आवडतात.

अभिनेते प्रत्येक भूमिकेनुसार हेअरस्टाइलचा नवनवा प्रयोग करत असतात. तीच फॅशन तरुणाईमध्येही तत्काळ येत असते. झक्‍कास दिसायला एखादी तरी हटकी स्टाइल हवीच, असे तरुणांना वाटत असतेच. त्यामुळे बॉलिवूड, मराठी फिल्म इंडस्ट्रिजमधील कलाकाराची एखादी स्टाइल हिट झाली की लगेच त्याकडे तरुणांचा ओढा वाढतो. मग, ती कोणाला आवडो ना आवडो, स्वत:ला आवडली म्हणजे बास झाले, असेच या तरुणाईचे मत असते. 

साताऱ्यातील तरुणाई यात मागे नाही. सोल्जर, फूल सोल्जर, साइड कट, हिप्पी, स्पाइस, फंकी या हेअरस्टाइलमधून ती पुढे गेली आहे. दोन्ही बाजूंनी जास्त केस कापून मध्यभागी जास्त केस असणारी बॉक्‍स कट, एका बाजूने केस कापून डोक्‍यावर मध्यभागी जास्त केस असणारी वन साइड, केवळ डोक्‍यावर थोडे केस आणि तिन्ही बाजूने जास्त कापले जाणारी आर्म कटची फॅशनची सध्या चांगलीच चलती असल्याचे सलून व्यावसायिक प्रणव जाधव याने सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News