पाहा! दीपिकाने रणवीरकडे केली 'ही' अनोखी मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 January 2020
  • रणवीर आणि दीपिका या दोघांमध्ये सोशल मीडियावर असा काही संवाद झाला की,या संवादाने सर्व नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ​

मुंबई: सध्या बॉलीवूडमध्ये 'स्वीट कपल'म्हणून अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणची जोडी प्रसिद्ध आहे.त्यामुळेच हे जोडपं इतर जोडप्यांसाठी आदर्श असून सुखी वैवाहिक जीवनासाठी ते सल्ले देत असतात.रणवीर आणि दीपिका यांच्यातील प्रेमामुळे हे जोडपं नेहमीच चर्चेत असतं. 'दिपवीर'म्हणून लोकप्रिय असणारी ही जोडी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. रणवीर आणि दीपिका या दोघांमध्ये सोशल मीडियावर असा काही संवाद झाला की,या संवादाने सर्व नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  

रणवीर सिंग नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो अपलोड करत असतो. '८३' हा रणवीरचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि त्याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. यावेळी त्याने इंस्टाग्रामवर काही फोटो अपलोड करून त्यामध्ये आपण चेन्नईमध्ये असल्याचे सांगितले. रणवीरने केलेल्या पोस्टवर लाईक्सचा पाऊस पडला आणि याच फोटोवर दीपिकाने कमेंट केली आहे. यावेळी दीपिकाचं  अस्सल बायकोच्या रूपात दिसली.  

मध्यमवर्गीय कुटुंबात नवरा कुठेही बाहेर गेला तर तो परत येईपर्यंत त्याच्याकडे काही न काही आणण्यासाठी एक सामानाची यादी दिली जाते किंवा सांगितली जाते. अशीच काही सामानाची यादी दीपिकाने रणवीरला दिली आहे. आणि ते फक्त आणण्यासाठी सांगितले नसून एक प्रकारचा हुकूमच दिला आहे. या यादीनुसार दीपिकाने श्रीकृष्ण या दुकानातून १ किलो मैसूर पाक, हॉट चिप्समधून २आणि अडीच किलो तिखट बटाट्याचे वेफर्स या वस्तू आणण्याचा एक प्रकारे हुकुमाचा दिला आहे. आता  रणवीर दीपिकाचं कितपत ऐकतो, आणि सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू आणतो का हे पाहणं उत्सुकाचं  ठरेल.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News