नवं वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात पर्यटकांची गजबज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 December 2019

लोणावळा : सरत्या वर्षास निरोप देण्यासाठी तसेच जुन्या वर्षातील कटू आठवणी विसरत नव्या वर्षाच्या स्वागतास पर्यटननगरी लोणावळा सज्ज होत आहे.

नूतन वर्षानिमित्त मौजमजा करण्यासाठी तसेच येथील प्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी लोणावळ्यात पुणे, मुंबईसह परराज्यांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यादरम्यान सेकंड होमबरोबरच बहुतांश हॉटेल, तसेच खासगी बंगल्यांमध्ये त्यांचे वास्तव्य असते. 

‘थर्टी फर्स्ट’ पार्श्‍वभूमीवर नाताळच्या सुट्या आल्याने पर्यटकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. पवन मावळ, राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, कोराईगडसह लोणावळ्यातील विशेषतः लायन्स पॉइंट, खंडाळा येथील सनसेट पॉइंट येथे पर्यटकांसह हौशी ट्रेकरची पसंती आहे.

पर्यटकांचे हॉटेल व रिसॉर्टपेक्षा खासगी बंगल्यांनाच अधिक प्राधान्य मिळत असल्याचे चित्र आहे. लोणावळा-खंडाळ्यात नाताळच्या सुट्या नववर्षाच्या पूर्वसंध्येस परिसरातील हॉटेल, रिसॉर्टच्या बुकिंगला पर्यटकांचा तसेच अनेक सेकंडहोम हाउसफुल झाले असून हॉटेलचे बुकिंग पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत झाले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News