लोकसभा निवडणूकीचा खर्च जाहीर, भाजपने उडवले चक्क 27 हजार कोटी रुपये...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

देशात निवडणुका आल्या की पक्ष श्रेष्ठी, नेते, कार्यकर्ते काय-काय करतील याचा काहीच नेम नाही. त्याची प्रचिती गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील दिसुन आली.

देशात निवडणुका आल्या की पक्ष श्रेष्ठी, नेते, कार्यकर्ते काय-काय करतील याचा काहीच नेम नाही. त्याची प्रचिती गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील दिसुन आली. 2019मध्ये झालेली लोकसभा निवडणुक ही खरा इतिहास गाजवणारी ठरली  हे जीतकं सत्य आहे, तितकचं या निवडणुकीत मोठ्याप्रमाणात पैसा उडवला गेला हेही सत्य आहे. सेंटर फॉर मिडीया स्टडीजने सध्या जाहीर केलेल्या अहवालानुसार गेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 60 हजार कोटी रुपयांची उधळण करण्यात आली. त्यापैकी फक्त भाजपाने 26 हजार कोटी रुपये निवडणुकीत खर्ची घातल्याने चर्चेला उधान आले आहे.

सीएमएसचे अध्यक्ष एन भास्करा राव यांनी बिझनेस स्टँडर्डला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हा आराखडा मांडला आहे. त्यांनी असेही विधान केले आहे की, 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या खर्चावरून जर 2024 च्या लोकसभा निवडणुकांचा आराखडा काढला तर तो खर्च तब्बव एक अब्जापर्यंत जाऊ शकतो. 

अहवालानुसार कशाप्रकारे झाला निवडणुकांवर खर्च...
सर्व खर्चाची बाब लक्षात घेता...
प्रत्येकी मतदारावर 700 रुपये खर्च
थेट मतदात्यांवर 12 ते 15 हजार कोटी खर्च
प्रसिध्दी मिळवण्यासाठी 20 ते 25 कोटी खर्च
वाहतुकीसाठी 5 हजार कोटी
औपचारिक खर्च 10 ते 12 हजार कोटी
इतर खर्च 3 ते 6 हजार कोटी

या खर्चामधला अधिका अधिक पैसा हा उद्योगपतींकडून उभारण्यात आला आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News