लॉकडाऊनमुळे पुन्हा हे चित्र बघता आलं...

दिपाली बोडवे
Monday, 29 June 2020

आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यत प्रत्येकाची धावपळ चालू असते. माणसांना स्वतःकडेही लक्ष देण्यासाठीही वेळ नसतो.

 आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यत प्रत्येकाची धावपळ चालू असते. माणसांना स्वतःकडेही लक्ष देण्यासाठीही वेळ नसतो.

आपल्या आजी आजोबांच्या काळात पाहिलं तर तेव्हा लोकं एकमेकांना वेळ देत होती. पोटभरून गप्पा-टप्पा करत होती. माणूस ओळखीचा आहे, की अनोळखी याचा ही ते विचार नाही करायचे. प्रत्येकजण लहान  असताना विटी दांडू , पकडापकडी, लपाछपी इ. खेळ एकत्र खेळायचे. 

पण, हे सगळं आता पाहायला मिळत नाही. प्रत्येक जण त्या भ्रमणध्वनीचा वापर करताना दिसत आहे.

पण, तुमच्या एक लक्षात आलं की नाही ? लॉकडाऊनमुळे जुने चित्र पुन्हा  दिसून येत आहे. प्रत्येकजण घरात का होईना एकत्र बसून गप्पागोष्टी, विविध प्रकारचे खेळ, खेळताना दिसून येत आहेत. आपण असं म्हणतो ना , प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल-वाईट हे असते, तसेच लॉकडाऊनमध्ये या अशा चांगल्या गोष्टी घडून येत आहे . प्रत्येकजण स्वतःला नव्याने ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊन कधीना कधी नक्कीच संपेल पण ही लागलेली माणसांची गोडी कधीच संपू नये.. एवढंच..!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News