लॉकडाऊन: आयुष्यात का महत्त्वाचे आहेत ३० मिनिट? WHOने दिला सल्ला!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 30 March 2020
लॉकडाऊन काळात जनतेची शारिरीक आणि मानसिक स्थिती चांगली रहावी यासाठी (WHO)जागतिक आरोग्य संघटनेने काही महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. शारिरीर स्वास्थ चांगल ठेवण्यासाठी नागरिकांनी दररोज ३० मिनिट वेळ दिला पाहीजे. तर लहान मुलांनी १ तास शारिरिक क्रीया कराव्यात असे म्हटले आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. ७ लाखापेक्षा अधिक लोकांना लोरोनाची लागन झाली. त्यातील ३३ हजारांपेक्षा अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले. मृत्यूंचा आकडा हा वाढतच आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन करणे हा एकमेव पर्यांय जगासमोर उरला आहे. त्यामुळे अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे एकाच जागी बसून नागरिकांची तब्बेत खराब होत आहे. त्याचा परिणाम शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर होतो.

लॉकडाऊन काळात जनतेची शारिरीक आणि मानसिक स्थिती चांगली रहावी यासाठी (WHO)जागतिक आरोग्य संघटनेने काही महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. शारिरीर स्वास्थ चांगल ठेवण्यासाठी नागरिकांनी दररोज ३० मिनिट वेळ दिला पाहीजे. तर लहान मुलांनी १ तास शारिरिक क्रीया कराव्यात असे म्हटले आहे.

५ कृती करा आणि निरोगी रहा..!

१. तरुणाई घरी बसून रोज एक तास ऑनलाईन क्लासेस घेऊ शकते. त्याच शारिरीक व्यायाम, योगा अशा प्रकारे स्वत:ला निरोगी ठेवता येते.

२. शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी डान्स क्लासला प्रवेश घेऊ शकता. दररोज ३० मिनिट डान्स केल्याने शरीरातील कॉलरी कमी होतात त्यामुळे स्वास्थ चांगले राहते आणि डान्सचा आनंद घेता येतो.

३. तासनतास व्हिडीओ गेम खेळून कंटाळा येत असेल तर शारिरीक हालचार करणारे छोटे- मोठे गेम घरामध्ये शेळता येऊ शकता. उदा. कॉरम, लुडो, सापसीडी, बॅडमीटन आदी.

४. शारिरीक स्वास्थ चांगल ठेवण्यासाठी दोरीवरच्या उड्या हा खेळ उत्तम आहे. त्यामुळे अंगातून धाम निघतो आणि मानसिक स्थिती चांगली राहते.

५. उठबशा आणि शरिर संतुलन अशा प्रकारे घरी बसून व्यायाम करु शकता. त्यासाठी जीमला जाण्याची गरज नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News