महाविद्यालयीन सीएचबी प्राध्यापकांचा लॉकडाऊन सत्याग्रह

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 April 2020
 • इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने प्राध्यापकांना वेतन द्यावे, केंद्रीय पद्धतीने नोकर भरती करावी यासह अनेक मागण्या प्राध्यापकांनी केल्या आहेत.

मुंबई: समान कामाचे वाटप आणि असमान वेतन देणाऱ्या सरकार विरोधात सीएचबीच्या प्राध्यापक १ मे रोजी लॉडाऊन सत्याग्रह करकणार आहेत. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने प्राध्यापकांना वेतन द्यावे, केंद्रीय पद्धतीने नोकर भरती करावी यासह अनेक मागण्या प्राध्यापकांनी केल्या आहेत. या मागण्यांना राज्यतील प्राध्यापकांनी मोठा प्रतिसाद दिला. सरकराने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास सत्याग्रह अधिक तिव्र करण्याचा इशार सीएचबी प्राध्यापकांनी दिला.

अशी केली जाते सीएचबी प्राध्यापकांची कोंडी

 • तासिका तत्वावरील प्राध्यापकांना तासिकेपुरते मर्यादित न ठेवता पुर्णवेळ थांबवुन इतर सर्व कामे करून घेतली जातात.
 • शासन सीएचबी प्राध्यापकांना बारामाही पगार व कुठल्याही शासकीय सुविधा देत नाही. उदा. प्रा. शोभाताई पाटील यांना बाळांतपणाच्या सुट्या मागीतल्या तर चक्क राजीनामा द्या असे सांगितले .
 • परमनंट प्राध्यापकांच्या संघटना आंदोलनात सीएचबी प्राध्यापकांचा वापर करतात. मात्र सीएचबी प्राध्यापकांच्या मागण्या शेवटच्या क्रमांकावर ठेवतात. शेवटी सवतीची वागणुक मिळते.
 • सद्यस्थितीतिल प्राध्यापक प्रक्रियेतून गलेलठ्ठ डोनेशनद्वारे नोकर्‍या दिल्या जात आहेत.
 • ज्याच्या पाकीटाचे ओझे जास्त त्याचीच निवड, चक्क वशीलेबहादुरी चालू आहे.
 • निवडसमीत्या संस्थाचालकांकडून दिलेल्या जाणार्‍या ओल्या पार्टीवर समाधानी होतात.
 • गोरगरीब, दिनदुबळ्या विद्यार्थ्यांच्या पी.एचडी, नोट- सेटची प्रमाणपत्रांचा उपयोग हंगामी सीएचबी गुलामीसाठी करतात.
 • समान काम -असमान वेतन म्हणजेच परमनंट तुपाशी सीएचबी उपाशी.
 • तासीकावरील कामाच्या अनुभवाला निवडप्रक्रियेत शुन्य महत्त्व दिले जाते.
 • ४० रू, ५० रू प्रती पेपर परीक्षा निरीक्षणासाठी. हे निरीक्षण सीएचबीने करायचे. परमनंट प्राध्यापकाने पगारी सुट्या टाकुन अलिप्त व्हायचे हे वर्षानुवर्षे नित्याचेच. सीए, नेट , सेट परीक्षा निरिक्षणासाठी ५०० रू, ६००रु प्रती निरीक्षण या कामात फक्त परमनंटलाच संधी.

काय आहेत मागण्या

 • परमनंट प्राध्यापकांच्या तुलनेत ९ ते १० तासीकांचा निम्मा कार्यभार तासीका तत्वावरील प्राध्यापकांना पेलावा लागतो. त्या तुलनेत ना मान, ना धन उरतो पदरी फक्त अपमान पडतो. 
 • सीएचबी धोरण रद्द करून गोवा राज्याप्रमाणे ४०,००० ते ४५,००० मासीक वेतन व सुवीधा मिळाव्यात.
 • उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रियेप्रमाणे महाराष्ट्रातील प्राध्यापक भरती प्रक्रिया १०० टक्के केंद्रीय पद्धतीने सुरू करावी.

औरंगाबाद- डॉ. शिवराज पाटील, नांदेड- डॉ. परमेश्वर पोळ, डॉ. बालाजी आव्हाड, अकोला- डॉ. प्रकाश पोहरे, प्रा. महादेव टापरे, प्रा. एकनाथ खेडकर, लातूर- राजेंद्र सुर्यवंशी, जळगाव- माधुरी पाटील, अमरावती- मंगेश ठाकरे, प्रा.जयेश तातेड, प्रा.मंगेश ठाकरे, सोलापूर- प्रवीण शिंदे, जालना- संतोष मगर, कोल्हापूर- शोभाताई पाटील यांच्यासह सर्व विद्यापीठांतील सीएचबी प्राध्यापकांचा सहभाग आहे. सत्याग्रहात कोणत्याही संघटना नसून सर्व पात्रताधारक व सीएचबी प्राध्यापक घरबसल्या १ मे २०२० या दिवशी सत्याग्रह करणार आहेत. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News