लॉकडाऊन काळात डॉक्टरांचा अभिनव उपक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 April 2020
  • रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळवून देणे आदी मदत असोसिएशन करीत आहे.

गोरेगाव : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांसाठी गोरेगाव वेल्फेअर असोसिएशनने धाव घेतली आहे. डायलिसिस अथवा गंभीर आजारांच्या रुग्णांना रिक्षा-टॅक्‍सीची सेवा उपलब्ध करून देणे, वृद्ध, आजारी, अपंग नागरिकांना जेवणाचा डबा, अन्नधान्य आणि औषधे घरपोच देणे, रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीमधून रक्त उपलब्ध करून देणे, रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळवून देणे आदी मदत असोसिएशन करीत आहे.

यासाठी असोसिएशनतर्फे डॉ. सुलभा रानडे सायंकाळी 4 ते 5 (9821866958), डॉ. गीता सामंत सायंकाळी 7 ते 8 (9833205646), डॉ. दर्शन कुलकर्णी स्त्रीरोग तज्ज्ञ सकाळी 11 ते दुपारी 1 (9820285951), डॉ. अमित संघवी हृदयरोग तज्ज्ञ सायंकाळी 6 ते 7 (9820628024) नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इतर काही विशेष रुग्णसेवेसाठी संस्थेच्या 9004077151 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News