रोजगारांमध्ये राज्यातील स्थानिकांना प्रथम स्थान असेल - अर्थमंत्री पवार

यिनबझ टीम
Friday, 6 March 2020

आज विधान सभेत महाविकास आघाडीचा पहिला  अर्थ संकल्प सादर केला जात आहे. हा अर्थ संकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यावेळी राज्यात उपलब्ध  असलेल्या 80 टक्के जागा या स्थानिकांसाठी राखीव ठेवल्या जातील आणि त्यासाठी कायदादेखील केला जाईल, असे मत अजित पवार यांनी अर्थ संकल्प सादर करताना मांडले आहे.

मुंबई - आज विधान सभेत महाविकास आघाडीचा पहिला  अर्थ संकल्प सादर केला जात आहे. हा अर्थ संकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यावेळी राज्यात उपलब्ध  असलेल्या 80 टक्के जागा या स्थानिकांसाठी राखीव ठेवल्या जातील आणि त्यासाठी कायदादेखील केला जाईल, असे मत अजित पवार यांनी अर्थ संकल्प सादर करताना मांडले आहे.

स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आग्रही असल्याचे मत अजित पवारांनी मांडले. राज्यात मेडिकल कॉलेजची संख्या वाढवून त्यासाठीदेखील निधी जाहीर करण्यात आला. राज्यशासनाकडून उच्च तंत्रशिक्षणासाठी 1300 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. 10 लाख शिकावू उमेद्वारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी 6 हजार कोटींची तरतुद केली जाईल, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे.

राज्यात कुषल मनुष्यबळ तयार करण्याची सध्या गरज आहे, त्यामुळे किमान 10 उत्तीर्ण झालेल्या तरुण आणि तरुणींना रोजगारांसंबंधीत प्रशिक्षण देण्याचं काम राज्य सरकार करणार आहे. क्रिडा क्षेत्रात तरुणांनी आपले करिअर तयार करावे यासाठी पुण्यातील बालेवाडीसारख्या ठिकाणी अंतराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ उभारणार, सोबतच मुंबई आणि नागपुर सारख्या ठिकाणी क्रिडा क्षेत्रांसाठी योग्य त्या तरतुदी केल्या जातील अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News