सलाम! मायनस 30 डिग्रीमध्ये देशसेवा, रक्त गोठण्याच्या थंडीतही जोश हाई

यिनबझ टीम
Thursday, 2 January 2020

मायनस  20 डिग्री तापमानात शूर सैनिकांना फक्त थंडीशी सामना करावा लागत नाही तर त्याचबरोबर शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवावे लागते. यासह, कोणत्याही प्रकारच्या सैतानी हेतू किंवा प्रयत्नांवर त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करावी लागते.

मायनस  20 डिग्री तापमानात शूर सैनिकांना फक्त थंडीशी सामना करावा लागत नाही तर त्याचबरोबर शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवावे लागते. यासह, कोणत्याही प्रकारच्या सैतानी हेतू किंवा प्रयत्नांवर त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करावी लागते.

दिल्लीत तापमान कमी होते तेव्हा आजूबाजूला चर्चा रंगते. परंतु  त्याच वेळी एलओसीवर वातावरण कसे असेल, जेथे तापमान सध्या उणे 20 ते उणे 30 अंश दरम्यान आहे, याची चर्चा जास्त रंगताना दिसत नाही. या विचित्र परिस्थितीत सैन्यातील शूर सैनिकांना आव्हानांचा सामना करावा लागतो. अशीच परिस्थिती सध्या तंगधार सेक्टरजवळील एलओसीवर असल्याचे समजते.

जम्मू-काश्मीरमधून कलम 37० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. याला भारतीय लष्कराकडूनदेखील समान प्रतिसाद दिला जात आहे. दरम्यान, नियंत्रण रेषेत दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे प्रयत्नही वाया जात आहेत. या सर्व आव्हानांचा सामना करत असतानाच, भारतीय लष्कर नियंत्रण रेषेवरील तापमानाचादेखील सामना करावा लागत आहे. कारण एलओसीवर असलेल्या थंडीचा पारा उणे 20 ते वजा 30 अंशांदरम्यान आहे.

हवामान आणि शत्रूविरूद्ध लढण्यासाठी येथील सैनिकांना विशेष कपडे व विशेष उपकरणे दिली जातात. बर्फाच्छादित प्रदेशात आपले जवान ज्या परिस्थितीत कर्तव्य बजावत आहेत, त्यांना मात्र हजार सलाम.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News