जुन्या पाठ्यपुस्तकांवरच चालणार शाळांचे नवे वर्ग

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

बिद्री - सर्वशिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. परंतु, मागील इयत्तेतील विद्यार्थ्यांकडून जमा केलेल्या जुन्या पुस्तकांच्या बाबतीत शासनाकडून कोणतेच आदेश नसल्याने या पुस्तकांचे करायचे काय, असा पेच शाळाप्रमुखांसमोर उभा आहे.

बिद्री - सर्वशिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. परंतु, मागील इयत्तेतील विद्यार्थ्यांकडून जमा केलेल्या जुन्या पुस्तकांच्या बाबतीत शासनाकडून कोणतेच आदेश नसल्याने या पुस्तकांचे करायचे काय, असा पेच शाळाप्रमुखांसमोर उभा आहे.

राज्यातील सर्वच व्यवस्थापनाच्या शाळा शासकीय व खासगी, तसेच समाजकल्याण, आदिवासी विकास विभाग, अपंग आयुक्तालयामार्फत चालविल्या जात आहेत. यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तसेच दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यभरातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते.बालभारतीतर्फे प्रकाशित पुस्तकांच्या गुणवत्तेनुसार एका पुस्तकाचे आयुष्य जवळपास तीन वर्षे असायला हवे, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. परंतु, एक वर्ष वापरलेली पाठ्यपुस्तके पुढच्या वर्षी वापरली जात नसल्याने दरवर्षी कोट्यवधीचा खर्च छपाईवर होतो.

त्यामुळे नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप केल्यावर जमा झालेली जुनी पुस्तके शाळांमध्ये साठून राहतात.सर्वशिक्षा अभियानाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना दिलेले पुस्तक शाळा परत घेऊ शकत नाही. त्यामुळे पुढच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांकडे असलेली जुनी पुस्तके पालकांकडून रद्दीत विक्री होताना दिसतात; तर काही शाळा पुढे-मागे चौकशीचा ससेमिरा नको म्हणून अशी जुनी पुस्तके जमा करून घेतात. या पुस्तकांवर सर्वशिक्षा अभियान व शाळांच्या नावाचे शिक्के असल्याने ही पुस्तके रद्दीत घालणे शाळांनाही अडचणीचे ठरत आहे.

विनाअनुदानित शाळांचे विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित

एकीकडे जुनी पुस्तके दरवर्षी रद्दीत निघत असताना नवीन पुस्तकांच्या छपाईवर कोट्यवधीचा खर्च सरकारला करावा लागत आहे. मात्र, तेवढीच जुनी पुस्तके रद्दीच्या भावात विक्रीला काढली जातात. एवढे करूनही कायम विनाअनुदानित शाळांतील लाखो विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित आहेत. कायम विनाअनुदानित शाळांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळत नाही. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News