जगताना..

पूर्वा बहाळकर
Saturday, 24 October 2020

क्षणभरासाठी तू तुला विसरले पाहिजे
सप्तरंगांची उधळण नभात झाली पाहिजे

जगताना..

सूर्यास्तासारख काही वेळासाठी 
अस्तिव मिटवता आले पाहिजे

रोजच्या सूर्योदया सारखे 
वागता ही आले पाहिजे

जगता जगता, जगता आले पाहिजे,
वर्दळीतली शांतताही जाणवली पाहिजे

क्षणभरासाठी तू तुला विसरले पाहिजे
सप्तरंगांची उधळण नभात झाली पाहिजे

लोकांनी तुला मग मार्गिक म्हटले पाहिजे
जगता जगता ,जगता आले पाहिजे,

जगण्याचा रसस्वाद घेता आला पाहिजे
कधी मिसळ,कधी जिलेबी तर कधी 
चिंचेसारखे क्षण चाखता आले पाहिजे

जिभेलाही जगण्याची चव कळली पाहिजे
जगता जगता ,जगता आले पाहिजे..

- पूर्वा बहाळकर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News