Live भ्रमंती With Dhiरु and ते

धिरज पवार
Saturday, 2 February 2019

माझ्या काळजाला अजूनही ती पाण्याची बॉटल, निघून जाणारी ट्रेन, बॉटल हातात घेऊन जीवाच्या आकांताने ट्रेनच्या मागे पळणारा तो आणि ट्रेनमध्ये हुंदके टाकणारी ती अजूनही प्रखरतेने समोर दिसतात.

धिरज पवार
9372482525

प्रेमाच्या भेटीची ट्रेन निघून गेली आणि पाण्याची बाटली हातातच राहिली. तिची आणि त्याची ही शेवटची भेट होती. कदाचित ते दोघे नंतर केव्हाच भेटणार नव्हते. आजपर्यंत प्रेमाने राहणारे, बोलणारे, भविष्याचे स्वप्न रंगवणारे. या स्वप्नांना आज पूर्ण विराम देणार होते!

ते दोघे, मी, माझा एक मित्र आणि मैत्रीण असे आम्ही पाच जण रात्री जेवण करून रेल्वे स्टेशनवर ट्रेन ची वाट पाहत उभा होतो. त्या दोघांच बोलणं चालू असतानी दोघे अचानक रडत आणि हसत ही होते. एकमेकांना डोळेभरून पाहत होते, कदाचित त्यांचं बोलणं हे डोळे करत होते. आयुष्याच्या या शेवटच्या भेटीची गाडी येऊच नये असे या दोघांना वाटत होते, मात्र तेवढ्यात गाडीचा आवाज आला आणि ते अचानक गळ्यात पडून रडू लागले. आजपर्यंत जे स्वप्ने रंगवली होती ती अचानक अशा अर्ध्या वाटेवर मोडणार होती, हे दोघांनही कळून चुकलं आणि दोघांचाही उर भरून आला.

आम्ही त्यांना सावरलं, तिला ट्रेनमध्ये रिझर्व्ह सिटीवर बसवलं. सर्वजण तिला भेटलो आणि ट्रेन मधून बाहेर आलो. तो मात्र बाहेर एका खांबाला टेकून तिला अखेरचा निरोप देत ऊभा होता. कारण त्याला माहित होतं, की ट्रेनमध्ये गेलो तर खाली उतरने अवघड होईल. शेवटी ट्रेन थोड्या वेळात निघणार असं कळताच तिने आमच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितलं; पण पाणी प्लॅटफॉर्मवरच्या स्टॉलमधून अनावं लागणार होतं.

तो धावत पाण्याची बाटली आणण्यासाठी गेला. ट्रेन हळू-हळू पुढे जाऊ लागली, तसा त्याच्या पळण्याचा वेग वाढला. पाण्याची बॉटल घेतली आणि त्या ट्रेनच्या दिशेने धाऊ लागला. गाडीचा वेग वाढत होता तसा त्याच्या पळण्याचा वेगही वाढत होता. अखेर ट्रेन निघून गेली, तरीही तो धावत राहिला मात्र पाण्याची अखेरची बॉटल त्याला, तिला देताच आली नाही!

train

हुंदके देत तो थांबला, रडू लागला आणि त्या प्रेमाची अखेरची गाडी निघून गेली होती. ती ट्रेनमध्ये हुंदके देत होती आणि हा स्टेशनवर हुंदके देत होता. पाण्याची बॉटल त्याच्या हाती होती, आम्ही सगळे त्याला समजावत होतो. थोडा वेळ गेला तो शांत झाला आणि आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो.

आमच्यासाठी प्रेमाच्या कहाणीचा अंत हा, रेल्वे स्टेशनवर जरी झाला असला; तरी तो अंत त्या दोघांच्या मनामध्ये तो आयुष्यभर असेल यात शंका नाही. माझ्या काळजाला अजूनही ती पाण्याची बॉटल, निघून जाणारी ट्रेन, बॉटल हातात घेऊन जीवाच्या आकांताने ट्रेनच्या मागे पळणारा तो आणि ट्रेनमध्ये हुंदके टाकणारी ती अजूनही प्रखरतेने समोर दिसतात.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News