‘नॅक’ मूल्यांकनासाठी एलआयटी सज्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 December 2019

दरम्यान, ‘एलआयटी’ला स्वायत्त संस्था करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांना साकडे घालण्यात आले होते.

विद्यापीठाद्वारे एलआयटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय आणि बरि. शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालय चालविण्यात येते. या महाविद्यालयांची गुणवत्ता वाढावी यासाठी विद्यापीठाकडून त्यांच्यासाठी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र, महाविद्यालयांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी गेल्यावेळी बरि. शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनाची परवानगी मागितली होती. मात्र, त्यावेळी विद्यापीठाने रिक्त पदांचे कारण समोर करून ती परवानगी नाकारली होती. यानंतरही महाविद्यालयाकडून नॅकसाठी अर्ज करण्यात आला होता. 

दरम्यान, ‘एलआयटी’ला स्वायत्त संस्था करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांना साकडे घालण्यात आले होते. त्यानंतर महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा, यासाठी तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना साकडे घालण्यात आले होते. 
मात्र, आता ते त्या खात्याचे मंत्री नसल्याने त्यावरील निर्णय अद्याप थंडबस्त्यात पडला आहे. त्यामुळे एलआयटीने ‘अभिमत विद्यापीठ’ दर्जा मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे ठरविले आहे.

यासाठीच काही महिन्यांपूर्वीच एलआयटीने विद्यापीठाकडून नॅक मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची परवानगी घेतली. आता नॅक मूल्यांकन पार पडल्यावर एलआयटीद्वारे  ‘अभिमत विद्यापीठ’चा दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर करणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News