ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी; पाहा आवडती फिल्म

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 July 2020

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा "गुलाबो सिताबो' हा चित्रपट ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. अन्य काही चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहेत.

मुंबई : सध्या चित्रपटगृहे बंद असल्याने अनेक निर्माते- दिग्दर्शक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. सोमवारी हॉटस्टारने प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची घोषणा केली. त्यामध्ये "लक्ष्मी बॉम्ब', 'भुज द प्राईड ऑफ इंडिया', "छलांग', 'सडक2', "द बिग बुल' अशा काही चित्रपटांचा समावेश आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित "सूर्यवंशी' आणि कबीर खान दिग्दर्शित 83 चित्रपट मात्र मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित होणार आहेत.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा "गुलाबो सिताबो' हा चित्रपट ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. अन्य काही चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहेत. अनेक दिवस चर्चेत असलेले "सूर्यवंशी' आणि 83 हे चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. "सूर्यवंशी' 24 मार्चला, तर 83 हा चित्रपट 10 एप्रिलला येणार होता; परंतु लॉकडाऊनमुळे सगळी समीकरणे विस्कळित झाली आहेत. त्यामुळे "सूर्यवंशी' दिवाळीत आणि 83 ख्रिसमसला प्रदर्शित होईल.

"सूर्यवंशी' चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले असून, अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारत आहे. कतरिना कैफही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कबीर खान यांचा 83 हा चित्रपट भारताने 1983 मध्ये जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. त्यांनी 1983 मधील विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

बिग डेव्हलपमेंट

"बिग डेव्हलपमेन्ट ... #सूर्यवंशी आणि #83 चित्रपट प्रथम थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची योजना आहे. सूर्यवंशी दिवाळीत आणि 83 नाताळमध्ये रिलीज होण्याची शक्‍यता आहे,'' असे व्यापार विश्‍लेषक तरण आदर्श यांनी ट्विटर पेजवर जाहीर केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News