आता लिपस्टिक करणार तरुणींचे रक्षण; ट्रिगर दाबल्यावर लगेचच फायरिंग

यिनबझ टीम
Friday, 10 January 2020

उत्तर प्रदेशमध्ये राहाणाऱ्या एका तरुणाने एक अनोखी शक्कल लढवली आहे. देशात वाढत्या महिला छळाच्या पार्श्वभूमीवर अँटी-इव्ह-टीझिंग लिपस्टिक गन (Anti-eve-teasing lipstick gun) तयार केली आहे. ही लिपस्टिक बंदूक लिपस्टिक सारखीच आहे, पण तिचा उद्देश अगदी वेगळा आहे.

वास्तविक, ही लिपस्टिक बंदूक पूर्णपणे महिलांनी वापरल्या जाणार्‍या लिपस्टिकसारखीच दिसते, परंतु जर एखादा व्यक्ती महिलेची छेड  काढत असेल आणि त्या महिलेकडे ही लिपस्टीक असले, तर या लिपस्टिकवर एक टिगर बटन आहे जे दाबताच गोळीबार सारखा आवाज येतो.

या गोळीबाराच्या आवाजाचे उदिष्ट म्हणजे घटनेच्या ठिकाणी लोकांचे लक्ष वेधणे हा आहे. कारण त्याचा आवाज एक किलोमीटरपर्यंत ऐकू शकतो. एवढेच नव्हे तर त्यामुळे आपले LIVE LOCATION पोलिसांपर्यंत पोहोचू शकते.

ती बनवणाऱ्या श्याम चौरसियाने सांगितले आहे की ही महिला सेफ्टी लिपस्टिक गन आहे, तिची खास गोष्ट अशी आहे की तिच्याकडे बंदूकही आहे आणि त्यामुळे 112 या क्रमांकावर वर कॉल देखील करू शकतो. ते म्हणाले की, रात्री उशिरापर्यंत काम करून घरी आलेल्या महिला आणि मुलींसाठी हे खूप महत्वाचं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News