लिप्स केअर टिप्स: 10 दिवसात ओठांचा काळेपणा दूर करून मिळवा नैसर्गिक गुलाबी ओठ 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 7 May 2020

मोबाइल किंवा लॅपटॉपचे  अल्ट्रा व्हायलेट रेंज  केवळ आपल्या त्वचेवर किंवा डोळ्यांनाच नव्हे तर आपल्या ओठांवरही परिणाम करते. अशा वेळी तुम्ही ओठांची काळजी घ्यावी जेणेकरून तुमचे ओठ खराब होणार नाही. चला, जाणून घ्या काही लिप्स केअर टिप्स-

मोबाइल किंवा लॅपटॉपचे  अल्ट्रा व्हायलेट रेंज  केवळ आपल्या त्वचेवर किंवा डोळ्यांनाच नव्हे तर आपल्या ओठांवरही परिणाम करते. अशा वेळी तुम्ही ओठांची काळजी घ्यावी जेणेकरून तुमचे ओठ खराब होणार नाही. चला, जाणून घ्या काही लिप्स केअर टिप्स-

लिप बाम:
 एसी  लिप बाम आणि लिपस्टिक वापरा. ज्यामध्ये एसपीएफ २० असणे गरजेचे आहे आपण याची खबरदारी घेतली पाहिजे की आपण चुकून कोणताही लीप  बाम वापरणार नाही, ज्याचे एसपीएफ 30 च्या वर असेल. ओठ खूप मऊ असल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

एक्सफोलिएट:
साखर आणि मधांचा टॅन पॅक ओठांवर  मृत त्वचा काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहे. तसेच बदामाचे तेल ओठांचा  ओलावा टिकवून ठेवू शकते. तुम्हाला शक्य असल्यास,   एलोवेरा जेल मध्ये साखर घालून आपण आपल्या ओठांवरची मृत त्वचा काढून टाकू शकता.

भरपूर पाणी
पाण्याअभावीदेखील ओठ काळे  होऊ शकतात, म्हणून दररोज किमान आठ ग्लास पाणी प्या. आपण नारळाचे पाणी, ऑरेजचा रस देखील घेऊ शकता. विशेषत: बीटचा रस ओठांना मऊ ठेवतो.

लिंबू, बटाटा आणि बीटरुट:
दररोज रात्री आपल्या ओठांवर लिंबू, बटाटा आणि बीटचा रस लावा. सकाळी धुवा. या उपायाने, ओठांचा काळेपणा दूर होईल आणि त्यांच्यात गुलाबी चमक वाढेल.

दररोज सफरचंद व्हिनेगर वापरा:
पाण्यात काही थेंब सफरचंद व्हिनेगर मिसळा आणि दररोज ओठांवर लावा. याने आपले  ओठ नैसर्गिक गुलाबी होतील. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News