लिओनेल मेस्सीचा नवा विक्रम 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 July 2020

मेस्सीने पेनल्टी सत्कारणी लावली, पण ऍटलेटिकोने दोन स्पॉट किकवर गोल करीत मेस्सीच्या पराक्रमी कामगिरीस विजयाची झळाळी लाभू दिली नाही.

माद्रिद : लिओनेल मेस्सीने कारकीर्दीतील सातशेवा गोल करण्याचा पराक्रम केला; पण त्यानंतरही बार्सिलोना स्पॅनिश फुटबॉल लीग अर्थात ला लिगा विजेतेपदापासून दूरच जात आहे. मेस्सीच्या बार्सिलोनाला ऍटलेटिको माद्रिदविरुद्ध 2-2 बरोबरी स्वीकारावी लागली.

मेस्सीने पेनल्टी सत्कारणी लावली, पण ऍटलेटिकोने दोन स्पॉट किकवर गोल करीत मेस्सीच्या पराक्रमी कामगिरीस विजयाची झळाळी लाभू दिली नाही. बार्सिलोनाच्या या बरोबरीमुळे रेयाल माद्रिदला दोन संघातील फरक चार गुणांपर्यंत नेण्याची संधी असेल. या स्पर्धेतील अजून पाच फेऱ्या शिल्लक आहेत. ऍटलेटिको तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी सेविलास दोन गुणांनी मागे टाकले आहे.

रेयाल माद्रिदला धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले, तरच बार्सिलोनास संधी असेल. पण रेयाल माद्रिदकडून चुका होतील, यासाठी दडपण आणणेही बार्सिलोनास साधलेले नाही. बार्सिलोनास चार सामन्यातील तिसऱ्या बरोबरीस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे मार्गदर्शक क्विक्‍यू सेतिएन यांचे पद धोक्‍यात आहे.

मेस्सीचा गोल धडाका

  • मेस्सीचे 700 गोल, त्यात 582 डाव्या पायाने, 92 उजव्या पायाने, तर 24 हेडरद्वारे
  • मेस्सीचे 24 गोल डायरेक्‍ट फ्री किकवर, तर 90 पेनल्टीवर
  • मेस्सीचे 580 गोल गोलक्षेत्रातून, तर 120 गोलक्षेत्राबाहेरून
  • सातशेपैकी 630 गोल बार्सिलोनाकडून खेळताना

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News