आयुष्मान घेणार बॉलीवूड मधून ब्रेक!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 24 December 2019

एकामागोमाग एक हिट चित्रपट दिल्यानंतर आयुष्यमानने चित्रपटांमधून थोडासा ब्रेक घेतला आहे. चित्रीकरणाच्या धावपळीमधून थोडा वेळ त्याने त्याच्या कुटुंबासाठी काढला आहे.

सध्या बॉक्‍सऑफिसवर अभिनेता आयुष्मान खुराणाच्या चित्रपटांची चलती आहे. एकामागोमाग एक हिट चित्रपट दिल्यानंतर आयुष्यमानने चित्रपटांमधून थोडासा ब्रेक घेतला आहे.

चित्रीकरणाच्या धावपळीमधून थोडा वेळ त्याने त्याच्या कुटुंबासाठी काढला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी त्याने पत्नी आणि मुलांसह परदेशवारी करण्याचे नक्की केले आहे. आयुष्मान म्हणतो, ‘एकापाठोपाठ एक चित्रपट केल्यानंतर मला स्वतःला प्रोत्साहित करण्याची आता वेळ आली आहे.

\शिवाय कामाबरोबरच कुटुंबाला वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता माझा व्हॅकेशन मोड ऑन झाला आहे.’ पुढील वर्षी पुन्हा बरेच बिग बजेट प्रोजेक्‍ट आयुष्मानकडे आहेत. पण आता सध्यातरी तो चित्रीकरणामधून ब्रेक घेणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News