"५ जी" मुळे आणखी बदल होणार

प्रशांत रॉय 
Saturday, 8 June 2019
  • आयुष्याशी निगडित सर्व सेवांमध्ये सुधारणा शक्‍य

नागपूर - विनाड्रायव्हरची कार रस्त्यावर धावतेयं, स्थानिक डॉक्‍टर जगात कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या रुग्णाच्या ऑपरेशनमध्ये भाग घेतोय, सिग्नलसह सिक्‍युरिटीचे ॲटोमॅटिक नियंत्रण....आदी स्वप्नवत वाटणाऱ्या बाबी आता प्रत्यक्ष अवतरणार आहेत. एकूणच आपल्या आयुष्याशी निगडित सर्व सेवांमध्ये सुधारणा होणार आहे. कारण देशात ५ जी मोबाईल  तंत्रज्ञानाला लवकरच परवानगी मिळण्याची शक्‍यता आहे.

काय आहे ५जी ?
५जी नेटवर्क १ सेकंदात २० गीगाबाइट एवढा डेटा ट्रान्सफर करू शकते. ३जी आणि ४जी च्या तुलनेत ५जी च्या मदतीने २० पटीने जास्त डेटा डाउनलोड आणि ट्रान्सफर करता येणार आहे.

ॲटोमॅटिक कंट्रोल
५जी च्या मदतीने स्वयंचलित कार एकमेकांशी चांगला ताळमेळ ठेवू शकतील. वाहतुकीसंदर्भातील माहिती, डायरेक्‍ट लोकेशन याची माहिती लाइव्ह मिळू शकेल. जसे की, शहरात मोर्चा निघाला तर ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होते. ५जी च्या मदतीने ॲटोमॅटिक पद्धतीने सिग्नल कंट्रोल करता येणे शक्‍य  होणार आहे. 

खर्चात मोठी बचत 
५जी च्या मदतीने घरे ‘स्मार्ट’ होतील. घरातील सिक्‍युरिटी सिस्टम, लाइट यांचा अतिवापर टाळता येणार आहे. यामुळे लाइटसाठी होणारा मोठा खर्च टाळता येणार आहे. 

स्वयंचलित कारचे नियंत्रण 
आता कार चालविण्यास चालकाची मदत लागते. मात्र, ५जी मुळे ती गरज भासणार नाही. ५जी च्या मदतीने स्वयंचलित कार्सना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून नियंत्रित करता येणार आहे.

आरोग्यासाठी फायदेशीर
५जी चा हेल्थ (आरोग्य) साठी मोठा उपयोग होणार आहे. आपण जर डॉक्‍टर असाल तर घरात बसूनच तुम्ही रुग्णावर उपचार, तपासणी करू शकाल. कदाचित देशाबाहेरील रुग्णाचे ऑपरेशनही करता येणे शक्‍य आहे. संकटाच्या काळात ५जी च्या मदतीने डॉक्‍टरांना बोलवणे शक्‍य होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News