मराठमोळा ठेका घेतांना अभिनेता आयुष्यमान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 21 August 2019
  • आयुष्मान खुराणाचे चित्रपट म्हणजे हास्यकल्लोळ
  • ‘ढगाला लागली कळ’ या गाण्यावर आयुष्मान थिरकणार
  • दादा कोंडके यांच्या या गाण्याचं रिमिक्‍स व्हर्जन
  • आयुष्मानबरोबर नुसरत भरुचाही

सहजसुंदर अभिनय आणि कॉमेडीच्या अचूक टायमिंगसाठी आयुष्मान ओळखला जातो. त्याने एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर चर्चा सुरू आहे ती त्याच्या ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाची. या चित्रपटामध्ये मराठीमधील एक सुपरहिट गाणं पाहायला मिळणार आहे.

अभिनेते दादा कोंडके यांच्या ‘ढगाला लागली कळ’ या गाण्यावर आयुष्मान थिरकताना दिसणार आहे. ‘ड्रीम गर्ल’मध्ये दादा कोंडके यांच्या या गाण्याचं रिमिक्‍स व्हर्जन तयार करण्यात आलं आहे. आयुष्मानबरोबर नुसरत भरुचाही या गाण्यामध्ये दिसणार आहे. सध्यातरी या गाण्याचे चित्रीकरण सुरू आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News