आयुष्य : जगणं आणि मरणं या दोन्ही मधलं अंतर कापण

विशाल जगदाळे, कराड
Tuesday, 26 February 2019

अंतर कसे कापतोय याला फार महत्व आहे. खरंतर संकल्पनांना भर देऊन स्वप्ने पहिली म्हणजे काहीच पाहता येत नाही आणि काही सापडत सुद्धा नाही.

आयुष्य म्हणजे पणतीतल्या वातीसारखे असतं, थोडा वेळ पेटत रहायचं आणि मग विझून जायचं. पण जेवढा वेळ ती वाट पेटलेली असते तेवढा वेळ ती संपूर्ण जगाला प्रकाश देऊन जाते. आपणही तसंच जगावं आयुष्यभर कोणत्या तरी न्युनगंडात खितपत पडण्यापेक्षा थोडेसच जगावं पण मान वर करून जगावं. कारण आयुष्य म्हणजे विश्वाच्या भयाण भुयारातून बाहेर पडण्यासाठी धडपड करणार एक पाखरुच ते. पाहिजे तिथे आणि पाहिजे तसं सैरभैर धावणार. अवास्तव वाटणाऱ्या गोष्टी वास्तव करून जगणारे लोक खूप कमी असतात.

प्रत्येक जण म्हणतो नक्की असत तरी काय आयुष्य? नक्की सुख म्हणजे काय? आपण जर डोळे बंद केले तर फक्त अंधारच दिसतो ना. तसच या सगळ्याचा अर्थ कोणी एका पुस्तकात लिहून ठेवलेला नसतो. दररोज जगताना आपण तो अनुभवायचा असतो. शेवटी आयुष्य म्हणजे जगणं आणि मरणं या दोन गोष्टींमधलं अंतर कापणे होय. पण ते अंतर कसे कापतोय याला फार महत्व आहे. खरंतर संकल्पनांना भर देऊन स्वप्ने पहिली म्हणजे काहीच पाहता येत नाही आणि काही सापडत सुद्धा नाही. आयुष्य केवढे का असेना, 10 वर्षाचे नाही तर 100 वर्षांचे पण ते समाधानानं, यशानं, आनंदानं, आदरानं आणि आपुलकीनं जगणं महत्वाचे असतं. शेवटी जगण्यात आणि मरण्यात तितकंच अंतर असतं जितकं सूर्य आणि चंद्रात, जमीन आणि आकाशात असत. हे अंतर कापण गरजेचे असतं. या 21 व्या शतकात सगळेजण प्रगतीकडे चालले आहेत पण तरीही या विज्ञानाच्या जगात आज नशिबावर विश्वास ठेवणारे लोक जास्त आढळतात. नशिबाच्या धाग्यात आणि हाताच्या रेषांमध्ये काय लिहून ठेवलय ते आपल्याला पण माहित नसतं.
           
पण हे नशीब ना, कधी कधी ताजमहाल दाखवतं तर कधी कधी झोपडी. आयुष्य म्हणजे खूप काही असतं, थोडसं हसणं तर थोडसं रडणं, थोडसं कमावन तर थोडसं गामावन, यशान हुरळून जाण तर अपयशाने हिरमसून जाण, महत्वाकांक्षाने उठून उभे राहणे तर भीतीने खालीच बसणं, विश्वासानं सगळे कमावणे तर अविश्वासाने सगळे गमावणे, श्रीमंतांची श्रीमंती म्हणजे आयुष्य तर गरिबांची गरिबी म्हणजे आयुष्य, आंधळ्यांचा आंधळेपणा आयुष्य तसाच लंगड्याचा लंगडेपणा म्हणजे आयुष्य, भिकाऱ्याच भीक मागणं म्हणजे आयुष्य तर चांभाराच चप्पल शिवणं म्हणजे आयुष्य, शेवटी मित्रांनो आयुष्य म्हणजे आयुष्य असतं. कसही जगा असं जगा नाहीतर तुम्हाला हवं तसं जगा शेवटी जो रोज 24 तासांचा एक दिवस गमावत जातो ना तेच तर असतं आयुष्य. गमावत आलेलो भूतकाळ, जगतोय तो वर्तमानकाळ, आणि घडणार भविष्यकाळ या तिघांना एकत्र गुंतवून घेणं म्हणजेच तर असत आयुष्य. शेवटी तुमचं आमचं सेमच असत. तुम्ही ओंजळीमध्ये पाणी घेतले काय आणि आम्ही घेतले काय दोघांचपन हात रिकामेच होणार ना..??
            
आयुष्य हे खरंच खूप सुंदर आहे ते कधी कोणी विनाकारण जीव देऊन संपवू नये. आयुष्य जगाव कारण इतका सुंदर खजिना पुन्हा पुन्हा सापडत नाही. गेलं की गेलंच. चार दोन दिवस लोक त्रास करून घेतील, घरचे 1 वर्ष त्रास करून घेतील आणि मग कालांतराने विसरून जाईल प्रत्येकजण स्वतःच्या वाटेवरती. म्हणून म्हणतो मित्रानो जगून थकलो म्हणून कोणतीही वाट कधीच सोडू नका कारण एकदा गमावलेला रस्ता पुन्हा सापडणं अशक्य आहे. एवढ्याशा आयुष्यात खूप काही घडत असतं पण काहीही झालं तरी दुःखाच्या प्रत्येक राशीवर एक सुखाची रास घालून जगावच लागत. कारण जगण्याला पर्याय नसतो. मागून कोणतीही गोष्ट मिळवू नये कारण उपकारांच्या आणि चुकांच्या ओझ्याखाली जगणं खरंच खूप अवघड असतं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News