जीवन, एक सुंदर स्वप्न

अनंत अर्चना
Friday, 23 August 2019

जीवनात छोट्या-छोट्या अडचणी, तक्रारी असल्या, अपेक्षाभंग झाला की, मरण्याचा, आत्महत्येचा विचार करणार्‍यांसाठी... 
जीवनापेक्षा मृत्यू जवळचा वाटणार्‍यांसाठी... खास करून महिलांसाठी...

धडधडणार्या हृदयाची 
किम्मत काय असते ... 
एका एका श्वासासाठी... 
लढणार्‍या जिवांना माहीत असते...

जीवन सुंदर स्वप्न
तर मृत्यू अंतिम सत्य असते 
मरण अणि जीवन यात 
एका श्वासाच अंतर असते....

त्या सुंदर स्वप्नाला 
प्रत्यक्षात उतरवायचे असते.... 
हेच जीवनाचे ध्येय 
अणि हेच उद्दिष्ट असते....

दुसर्‍यासाठी जगता जगता.... 
स्वतः साठी जगायचे असते... 
ते जगणं ही काय जगणं असत 
ज्याचा फक्त मरणाने शेवट होत असते ....
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News