आयुष्याची उधारी

प्रदीप अधिकारी
Tuesday, 4 June 2019

जमलं तर, व्याजासकट 
परत फेड करून, 
सांगावा येताच,
जाईन म्हणतोय !

झाकली मूठ गहाण ठेवून,
फार नाही, थोडसं आयुष्य
उधार घेईन म्हणतोय !

जमलं तर, व्याजासकट 
परत फेड करून, 
सांगावा येताच,
जाईन म्हणतोय !

झाडावरही आता, 
फारसं कांही उरलं नाही. 
तरीही थकलेल एखाद पान,
शिशिरांतही गळत नाही !

वासाच्या पावसाची ओढ, 
अजूनही सुटत नाही.
मातीत रुजलेल मूळ,
अजूनही तुटत नाही !

मुळापाशीच फुटलेला 
दमदार धुमारा, 
तरारून वर आलेला
पाहू म्हणतोय !

मग मात्र,
सांगावा येताच, 
जाईन म्हणतोय. 
तोवर, थोडसं आयुष्य
उधार घेईन म्हणतोय !!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News