चला बनवूया आज, कुरकुरीत कारलं

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

आहारात कुरकुरीत कारल्याचा समावेश केल्यास आपल्याला भरपूर फायदा मिळतो. याच पार्श्वभूमीवर कुरकुरीत कारलं बनविण्याची पाककृती जाणून घेऊयात...

आहारात कुरकुरीत कारल्याचा समावेश केल्यास आपल्याला भरपूर फायदा मिळतो. याच पार्श्वभूमीवर कुरकुरीत कारलं बनविण्याची पाककृती जाणून घेऊयात...

साहित्य

दोन मध्यम आकाराची कारली, जिरं पूड, गरम मसाला, किसलेले खोबरे, फोडणी साहित्य - तेल, हिंग, जिरे, मोहरी, चवीनुसार मीठ.

कृती

  1. कारल्याचे साल काढून बारीक तुकडे करून घ्यावेत. कारल्याच्या तुकड्यांत मीठ टाकावं आणि ते चांगले चुरून घ्यावेत. 

  2. नंतर पाणी घालून तुकडे घटृ पीळून घ्यावेत. फोडणीसाठी तेल गरम करून घ्या, त्यामध्ये हिंग, जिरं, मोहरी, हळद टाका. 

  3. आता कारल्याचे तुकडे व थोडे मीठ (चवीनुसार) तेलात घालून चांगले परतावे, व झाकण ठेवून एक वाफ काढावी. 

  4. नंतर झाकण काढून ठेवावे आणि किसलेले खोबरे घालावे. कारली कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावीत. 

  5. अर्धा चमचा जिरे पूड आणि हवा असेल तर गरम मसाला घालावा. गरमागरम कुरकुरीत कारली तयार होतील. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News