जगणे करुया, टेन्शन फ्री..!

लक्ष्मण जगताप
Wednesday, 11 September 2019

एखादे काम करताना आपल्याकडून चुक  झाली तर आपण प्रांजळ पणे कबूल केली पाहिजे. म्हणजे पुढील अनर्थ टळतात. वादविवादाचे प्रसंग निर्माण होत नाहीत.

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तयारी करणे आवश्यक असते. मग अशी तयारी करत असताना आपल्या हातून चुका होत असतात. काही चुका नकळत होत असतात. पण त्याच चुका वारंवार करणे योग्य नव्हे. 

एखादे काम करताना आपल्याकडून चुक  झाली तर आपण प्रांजळ पणे कबूल केली पाहिजे. म्हणजे पुढील अनर्थ टळतात. वादविवादाचे प्रसंग निर्माण होत नाहीत. चुक होऊनही मान्य न करता माझेच बरोबर अशी भूमिका घेतल्याने आपणच समस्या निर्माण करतो. त्यामुळे मोठ्या संकटांना आपण निमंत्रण देतो.
 
चुक कबूल केल्याने कोणतेही नुकसान होत नाही. समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल वेगळी आणि चांगली प्रतिमा निर्माण होण्यास मदत होते. यापुढे काम करताना व्यवस्थित लक्ष देऊ. चुका होणार नाहीत याची कटाक्षाने दक्षता घेऊ. आणि झाल्या तर त्या सुधारु अशी प्रामाणिक भूमिका घेतली तर बरेचशे प्रश्न सुटतात. 

चूक कबूल करणे म्हणजे कमीपणा नव्हे, तर तो तुमच्या मनाचा मोठे पणा असतो. तुमच्या विचारांची परिपक्वता असते. तुमचा तो समंजसपणा असतो. चुक  कबूल केल्याने आपला यशाचा मार्ग खुला झाला असे समजा. सध्याचे जग वेगवान झाले आहे. माणसाला ताणतणावाला सामोरे जावे लागते. यातून मग चुका होतात. त्या वेळीच मान्य करणे आपल्या हिताचे ठरते. 

पण एकच चुक आपण वारंवार करत असू तर निश्चितच आपल्याला आत्मचिंतन करावे लागेल. आपली कामाची पद्धती तपासून पाहावी लागेल. आपल्या चुका का होतात हे आपल्याला शोधून काढावे लागेल. आणि पुन्हा न होण्यासाठी आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. 

कोणतेही काम सफाईदार, नीटनेटके आणि अचूक होण्यासाठी नियोजन आवश्यक असते. कामाचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी लागते. जबाबदारी निश्चित करून कामाची वाटणी करावी लागते. त्यामुळे आपल्याला चुका टाळता येतात. खूप चांगले नियोजन करूनही नकळतपणे चुका झाल्या तर माफी मागणे अतिशय योग्य ठरते. त्यामुळे आपल्या मनावरील दडपण आणि ताण दूर होण्यास मदत होते. 

आपले जगणे आनंदी, मजेत आणि टेन्शन फ्री होण्यासाठी मोकळ्या मनाने चुका कबूल करुयात.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News