एकच मित्र असा मिळावा...

 विजयकुमार देशपांडे
Saturday, 10 August 2019

मित्रात जेव्हां अतूट मैत्री
विश्वासाची पक्की खात्री !

संकटकाळी हात देशील
अडचणीत मदत घेशील,

चहाडी चुगली कानावर हात
मैत्रीत नसते जातपात !

मैत्रीला लागत नाही कात्री 
असते मैत्रीत पक्की खात्री,

मित्रात जेव्हां अतूट मैत्री
विश्वासाची पक्की खात्री !

उपकार होतील खूप तुझे
देवा, एकच मागणे माझे,

एकच मित्र असा मिळावा 
कृष्ण-सुदामा आदर्श रहावा !

 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News