चला आज जाणून घेऊया, केसरी रवा कसा बनविला जातो... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

आहारात रवा केसरीचा समावेश केल्यास आपल्याला भरपूर फायदा मिळतो. याच पार्श्वभूमीवर रवा केसरी बनविण्याची पाककृती जाणून घेऊयात...

आहारात रवा केसरीचा समावेश केल्यास आपल्याला भरपूर फायदा मिळतो. याच पार्श्वभूमीवर रवा केसरी बनविण्याची पाककृती जाणून घेऊयात...

साहित्य : 

1 वाटी तूप, 3 वाटी काजू - बदाम - पिस्ता, 1 टेबलस्पून मनुके, 1 वाटी बारीक रवा, 3 वाटी पाणी, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, 4 केशर काड्या, 2 टीस्पून वेलचीपूड, 1 खाण्याचा कापूर.

कृती : 

  1. 3 चमचे कोमट दूधात केशर काड्या टाकून बाजूला ठेवा व उरलेले दूध रव्यासाठी वापरा. 
  2. मंद आचेवर कढईमध्ये 3 टेबलस्पून तूप गरम करून सुकामेवा खमंग परतून घ्या, व बाऊलमध्ये काढा. 
  3. त्याच कढईत रवा 10 मिनिटे भाजून घ्या. जड बुडाच्या कढईत पाणी व दूध उकळवून घ्या. 
  4. मंद आचेवर ठेवूनच त्यामध्ये भाजलेला रवा टाकून सतत ढवळत रहा. नंतर त्यामध्ये साखर टाका.
  5. नंतर केशर दूध व 2 वाटी तूप घालून पुन्हा ढवळा व 5 मिनिटे झाकण ठेवून पूर्ण शिजू द्या. अखेरीस वेलचीपूड व सुकामेवा घालून ढवळा. 
  6. केसरी पॅनला चिकटली नाही म्हणजे ती व्यवस्थित शिजली. नंतर द्रोणांमध्ये काढून घ्या. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News