प्रेमाच्या फेब्रुवारीत पुन्हा 'बेधुंद' होवुया...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020

प्रेमात पुन्हा ‘बेधुंद’ होवुया!

‘बेधुंद’ प्रेम करुया! 

तरुणांच्या प्रेमाला गवसणी घालणारा व्हेलेंटाईन वीक आणि व्हेलेंटाईन डे साजरा होऊन अगदीच काही दिवस उलटले आहेत. प्रेमाचं वर्षाव करणाऱ्या या दिवसांच तरुणांसाठी एक वेगळंच महत्व असतं. विशेष म्हणजे आपल्या प्रेमाबरॊबर प्रेमाची गाणी ऐकण्याची या दिवसांमध्ये काही वेगळीच मजा असते. मात्र साईक्षा फिल्म्स अँड क्रिएशनची प्रेमाबाबतची काही वेगळीच गणितं पाहायला मिळत आहेत. शतदा प्रेम करावे आणि करत रहावे असं म्हणत साईक्षा फिल्म्स अँड क्रिएशन "बेधुंद" हे मराठी गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. 

बेधुंद गाण्याचं दिग्दर्शन रोहितराज कांबळे यांनी केलं असून, प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल आणि गायक हर्षवर्धन वावरे यांनी गाणं गायलं आहे. तसेच गाण्याची रेकॉर्डिंग ठाण्याच्या सीएनएम म्युझिक फॅक्टरी या स्टुडिओमध्ये पार पडले आहे. मराठीमधील ‘तू जिथे मी तिथे’, मन हे बावरे, सख्या रे साजना सारखी प्रसिद्ध गाणी नेहाने गायली आहेत, तर ‘धागा धागा’, ‘सिंपल’, ‘रोज मला विसरून मी’, ‘गरा गरा’ ही गाणे हर्षवर्धन ने गायली आहेत. यातच बेधुंद गाण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे नेहा आणि हर्षवर्धन या दोन्ही प्रसिद्ध गायकांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन काम केलं आहे. बेधुंद मी बेधुंद तू’ असे या गाण्यांचे बोल आहेत. गाण्याचे निर्माते डी. संजयकिरण आहेत तर अविष्कार विश्वासराव यांचे संगीत आणि गीत रोहितराज तुकाराम कांबळे यांचे स्वतःचे आहेत. 

बेधुंद गाण्याबाबत बोलताना गायिका नेहांनी म्हटले आहे की, हर्षवर्धन बरोबर मी पहिल्यांदाच गायन केलं आहे, प्रेमाच्या फेब्रुवारीत या गाण्याची रेकॉर्डिंग होत असल्यामुळे आणि प्रेमाच्या संदर्भात हे गाणं असल्यामुळे नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भावणार आहे, तर हर्षवर्धन ने म्हटले आहे की, नेहाबरोबर गाण्याची संधी मिळाल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. तसेच रोहितचेही कौतुक केले पाहिजे कारण त्याने अगदी कमी वयात इतकं प्रोडक्शन जमून आणलंय. 

व्हॅलेन्टाईन वीक सर्वांनी साजरा केलाय प्रेमाच्या या मोसमात आम्ही प्रेमावर आधारित अल्बमचे रेकॉर्डिंग पूर्ण केले आहे. हर्षवर्धन आणि नेहाने उत्तम गायन केलं आहे. बेधुंद तुम्हाला बेधुंद केल्यावशिवाय राहणार नाही असे निर्माता डी.संजयकिरण यांनी सांगितले आहे तर, दिग्दर्शक रोहितराज यांनी सांगितले आहे की, तरुण पिढीसाठी बेधुंद हा अल्बम लवकरच घेऊन येत आहोत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News