भारतीय वायू दलाची मारक शक्ती वाढणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 July 2020

अत्याधुनिक "अपाचे' आणि "चिनूक' हेलिकॉप्टर भारतीय वायू दलाच्या ताफ्यात आले आहे. भारत-अमेरिकेदरम्यान झालेल्या सरंक्षण करारानुसार बोईंग कंपनीकडून ही अत्याधुनिक हेलिकॉप्टर मिळाली आहेत.

मुंबई : अत्याधुनिक "अपाचे' आणि "चिनूक' हेलिकॉप्टर भारतीय वायू दलाच्या ताफ्यात आले आहे. भारत-अमेरिकेदरम्यान झालेल्या सरंक्षण करारानुसार बोईंग कंपनीकडून ही अत्याधुनिक हेलिकॉप्टर मिळाली आहेत. हिंडन लष्करी तळावर बोईंगने 22 अपाचे हेलिकॉप्टर भारतीय वायू दलाच्या हवाली केले. यापूर्वी मार्चमध्ये बोईंगने 15 "चिनूक' हेलिकॉप्टर हवाई दलाला सोपवले होते. यामुळे भारतीय वायू दलाची मारक क्षमता वाढणार आहे.

अमेरिकेसह 17 देशांकडे अन्य काही देशांच्या लष्करी ताफ्यात एएच - 64 ई अपाचे हेलिकॉप्टर आहे. अत्याधुनिक संपर्क यंत्रणा, नेवीगेशन, सेंसर आणि मारक शस्त्रानिशी ते सुसज्ज आहे. लक्ष्यावर अचूक हल्ला चढवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. दिवसा आणि रात्रीच्या अंधारातही ते लक्ष्य अचूक गाठू शकते. हवेतल्या हवेत आणि जमिनीवरील लक्ष्य टिपण्याची या हेलिकॉप्टरची क्षमता आहे. शांती मोहीम असो की युद्धजन्य परिस्थिती या दोन्ही परिस्थितीत हे अत्यंत उपयुक्त आहे.

जगातील 22 सरंक्षण दले "चिनूक' हेलिकॉप्टर वापरतात किंवा ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या 50 वर्षांपासून कुठलीही भौगोलिक परिस्थिती असो "चिनूक' हेलिकॉप्टर जगातील अत्यंत विश्‍वसनीय हेलिकॉप्टर ठरले आहे. त्यातही भारताने मिळवलेले "सीएच - 47 एफ (आय)' हे सर्वात आतापर्यंतचे सर्वात अत्याधुनिक मॉडेल आहे.

भारतीय संरक्षण दलाने 2015 मध्ये "बोईंग'कडे 15 "सीएच - 47 एफ (आय)' चिनूक आणि 22 एएच - 64 ई अपाचे हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी, हस्तांतरण आणि ट्रेनिंगसाठी करार केला होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवी दिल्ली दौऱ्यादरम्यान सहा "अपाचे' हेलिकॉप्टरसाठी हस्तांतरणासाठी भारत-अमेरिकेदरम्यान करार झाला होता. "मेक इन इंडिया' अंतर्गत बोईंगने टाटा बोईंग एरोस्पेस लिमिटेडसोबत हैदराबाद इथे संयुक्त रितीने "अपाचे' हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News