आत्महत्येचा कलंक पुसून टाकू

शिल्पा नरवडे
Tuesday, 28 July 2020

तरुणांच्या सर्वात जवळील मित्रमैत्रीण हे त्याचे आईबाबा असतात, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना अभ्यासामध्ये, करियरमध्ये अपयश आल्यानंतर समजून घेणे गरजेचे आहे. त्यांना बोलत केलं पाहिजे, एकदा पडल्यानंतर जो पुन्हा उठून जोमाने पळायला लागतो तो शर्यत जिकल्याशिवाय राहत नाही.

आत्महत्या ही भारत देशासमोरील एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आपल्या आजूबाजूला नेहमी दोन प्रकारची माणसे वावरत असतात. एक म्हणजे स्वतःला जीवापाड जपणारी आणि दुसरी म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्याचा जीव पण घेणारी. तसेच या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाचा निभाव लागावा म्हणून आज जो तो धडपड करतोय. तस पाहिलं तर या आधुनिक काळामध्ये कोणी यश मिळवण्यासाठी पळतोय तर कोणी प्रेमासाठी झगडत आहे. पण या सगळ्या गोष्टी करत असताना समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आनंदी आयुष्याच्या व्याख्यांचा बदल झालेला दिसून येतो. नाण्याला जशा दोन बाजू आहेत अगदी तशाचप्रकारे अपयशाला देखील दोन बाजू आहेत 1) यश 2) अपयश. 

यशाचा मार्ग सर्वाना हवाहवासा वाटतो, पण अपयश हे पचवायला कठीण असल्यामुळे लगेचच आत्महत्या हा मार्ग स्वीकारला जातो. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो. तरी सुद्धा आपण कुठेतरी कमीच पडत असतो. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनाचा संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो, आणि त्या संघर्षमयी वाटेवरूनच यशाचे शिखर गाठायचे असते. हे शिखर गाठताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण त्या अडचणींना तोंड न देता तांनतनाव नैराश्य यातून स्वतःला लगेच संपवले की सगळेच प्रश्न सुटतील अशे विचार मनात घर करू लागतात. आणि मग आत्महत्या हेच टोकाचे पाऊल उचलले जाते. हे खूप चुकीचे आहे. 
 
समाजामध्ये आत्महत्या करण्यामध्ये तरुणाईचा जास्त कल आहे. याचे कारण असे की प्रत्येक मुलाचे आईवडील हे त्याच्याकडून करियर विषयी नको त्या अपेक्षा ठेवतात, त्यांच्यावर अभ्यासाचे स्पर्धा परीक्षाचे मानसिक दडपण लादले जाते. आणि मग त्यात अपयश आल्यावर ही मुलं टोकाचं पाऊल उचलतात. मुख्य म्हणजे काही मुलांचे तर नको ते लाड पुरवले जातात, त्याच्या आयुष्यामध्ये नाही हा शब्दच मुळीच त्यांना माहीत नसतो आणि मग पुढे जाऊन नाही शब्द ऐकायला मिळाला की त्यांना जीवन संपवणे सोडून दुसरं काही सुचतच नाही. त्याहीपलीकडे जाऊन पाहिलं तर आज प्रेमाच्या अट्टहासापायी बहुतेक तरुण तरुणी आत्महत्या करत आहेत. 
 
तरुणांच्या सर्वात जवळील मित्रमैत्रीण हे त्याचे आईबाबा असतात, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना अभ्यासामध्ये, करियरमध्ये अपयश आल्यानंतर समजून घेणे गरजेचे आहे. त्यांना बोलत केलं पाहिजे, एकदा पडल्यानंतर जो पुन्हा उठून जोमाने पळायला लागतो तो शर्यत जिकल्याशिवाय राहत नाही. त्यांना धैर्याने त्या गोष्टींचा सामना करायला शिकवलं तर त्यांना नक्कीच यश मिळेल. अभ्यासक्रमामध्ये विषय ठेवण्यापेक्षा त्या व्यक्तींना घरच्यांनी समजून घेणे गरजेचे आहे, अपयश आल्यानंतर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे मला वाटते. 

1) दिवस -रात्र ( अंधार- उजेड)
यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर अंधारांनंतर उजेड नसेल तर त्या अंधाराला काही किंमतच नसते.
2)सुख -दुःख, आयुष्यामध्ये फक्त सुखच उपभोगायला मिळालं तर दुःखाच महत्त्वच समजलं नसते 
3) अगदी तशाच प्रकारे मनुष्याच्या जीवनात फक्त त्याला यशच मिळालं तर त्याला अपयशाची चव कशी चाखता येणार... म्हणून यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींचा आनंद माणसाला घेता आला पाहिजे. अपयश आल्यावर आत्महत्या न करता दोन्ही हातांनी त्याचा सहज सामना करायला शिका, मानवाचे जीवन हे एकदाच आहे त्यामुळे आत्महत्या हा त्या जीवनाला लागलेला कलंक आहे, त्यामुळे तो कलंक पुसून टाकून जीवनाचा मनोसोक्त आनंद घ्यायला शिका...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News