प्रत्येक व्यक्तीने आपल्यात आणि दुसऱ्यात चांगले ते पहावे : सुलक्षणा सावं

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

त्येक व्यक्तीने आपल्यात आणि दुसऱ्यात चांगले ते पहावे. नेहमीच सकारात्मक विचार करून खडतर प्रवास करून यशस्वी व्हावे. एकाने दुसऱ्याला मदतीचा हात देऊन वर काढणे यात आनंद मिळतो. हेवा, द्वेश मत्सर सारख्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या बरोबरच दुसऱ्याचेही भले व्हावे

बोरी : प्रत्येक व्यक्तीने आपल्यात आणि दुसऱ्यात चांगले ते पहावे. नेहमीच सकारात्मक विचार करून खडतर प्रवास करून यशस्वी व्हावे. एकाने दुसऱ्याला मदतीचा हात देऊन वर काढणे यात आनंद मिळतो. हेवा, द्वेश मत्सर सारख्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या बरोबरच दुसऱ्याचेही भले व्हावे हा मंत्र सगळ्याच महिला वर्गाने जपल्यास आपल्या समाजाचा विकास होण्यास उशीर लागणार नाही, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चा अध्यक्ष आणि समाजसेविका प्रा. सुलक्षणा सावंत यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या फिड इंडिया या उपक्रमांतर्गत लोलये येथील सेवा संकल्पच्या कै. यशोदाबाई क्षीरसागर वसतीगृहातील समारोप समारंभाच्या प्रमुख अतिथी म्‍हणून प्रा. सामंत बोलत होता. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्ष डॉ. प्रा. अनिता तिळवे, विश्‍व हिंदू परिषद मुंबई येथील पदाधिकारी शशिकांत करंदीकर, प्रकल्प अधिकारी मालतीका मिराशी, जिल्हा पंचायत सदस्य डॉ. पुष्पा अय्या, पंचायत सदस्य शैलेश पागी, संस्थेचे ज्येष्ठ सदस्य बाबू कोमरपंत आदी उपस्थित होते. प्रा. सुलक्षणा सावंत म्हणाल्या की, मुलींच्या संवर्धनासाठी वसतिगृह चालवून मुलींच्या पोषणाची जबाबदारी घेणे हे मोठे कार्य आहे. संस्थेचे पदाधिकारी करत असलेल्या कार्याला तोड नाही. वसतिगृहात राहून शिकणाऱ्या मुलांनी चांगल्या तऱ्हेने वागून आपल्या बरोबरच वसतिगृहाचा नावलौकिक वाढवण्याचे आवाहन केले. 

शशिकांत करंदीकर म्हणाले की, मुलींचे वसतिगृह चालवणे ही मोठी जिकिरीची कामगिरी आहे परंतु या वसतिगृहाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत चाललेले कार्य हे कौतुकास्पद असे आहे. या वसतिगृहाला नावलौकिक मिळवून देणारे कार्य मुलींनी करावे तसेच उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न करावा. या संस्थेच्या कार्याची करंदीकर यांनी प्रशंसा केली.डॉ. प्रा. अनिता तिळवे म्हणाल्या की, मुलींच्या संगोपनाचा आणि पालनपोषणाचा वसा घेऊन एक सेवा व्रत म्हणून आम्ही संस्थेच्या कार्याला झोकून दिलेले आहे. त्या कार्यासाठी अनेकांची मदत लाभत आहे. या वसतिगृहातील मुली चांगल्या तऱ्हेने वागून इतरांना आदर्श घालून देत आहेत. वसतीगृहातर्फे मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा आढावा त्यांनी घेतला.

बाबू कोमरपंत यांच्या हस्ते शशिकांत करंदीकर यांच्या सेवेतील प्रदीर्घ योगदानाबद्दल तसेच संचालिका गीतांजली यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.विविध स्पर्धांतील विजेत्यांना तसेच गतवर्षीच्या इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.संस्थेच्या अध्यक्ष डॉ. प्रा. अनिता तिळवे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संस्थेचे कोषाध्यक्ष सतीश भट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सचिव सदानंद आमोणकर यांनी आभार मानले.वसतिगृहाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुमारे ५५ मुलींनी सायकलिंग आणि दोरी उड्या मारून उपस्थितांकडून वाहवा मिळविली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News