सायकल रायडिंगमधून 'निरोगी आरोग्याचे' धडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 January 2020

सायकल वापरणाऱ्यांना सध्या प्रतिष्ठा नाही. या एकमेव कारणाने अनेकजण सायकल वापरत नाहीत. या गोष्टीलाही प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. त्यांचे कौतुक झाले पाहिजे. म्हणजे या बाबीचे अनुकरण नागरिक करतील. प्रशासकीय इमारतीत दहाजण सायकल वापरू लागले तरी त्याचा फायदा प्रदूषण नियंत्रणासाठी होऊ शकतो. 

उस्मानाबाद : कृषी विभागाच्या नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात अधिकारी म्हणून काम करणारे सचिन पांचाळ हे दररोज सायकलवरून कार्यालयात ये-जा करतात. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाकडे विविध कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी कौतुक करीत कुतूहलाने पाहत आहेत. 

अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी सचिन पांचाळ हे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची जबाबदारी पाहतात. शहरातील बार्शी नाका परिसरात ते राहतात. दररोज सकाळी साडेनऊ वाजता ते स्वतःच्या घराकडून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालयाकडे सायकलीने निघतात. प्रशासकीय इमारतीच्या परिसरात येताच अनेकजण त्यांच्याकडे कुतूहलाने पाहतात. एक वर्षापासून त्यांचा हा नित्यक्रम सुरू आहे. दररोज किमान पाच किलोमीटर सायकलवर फिरतात.

सुरवातीचे काही दिवस परिसरातील अधिकारी-कर्मचारी त्यांच्याकडे पाहून अवाक्‌ होतात. अनेक वेळा प्रशासकीय इमारीतीतून जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना बैठकीसाठी जावे लागते. बहुतांश वेळा ते जिल्हाधिकारी कार्यालयातही सायकलने जात असल्याचे श्री. पांचाळ सांगतात. हल्ली प्रत्येक कार्यालयाच्या प्रमुखाला चारचाकी वाहन, सोबतीला सहायक म्हणून कर्मचारी असतात. चारचाकी वाहनाशिवाय अधिकाऱ्याची कामे होत नाहीत. हे सत्य असले तरी जेव्हा चारचाकी वाहनाची गरज नसते तेव्हा अनेक अधिकारी १० मिनिटांच्या अंतरासाठीही चारचाकी वाहनांचाच वापर करतात. मात्र श्री. पांचाळ दररोज सायकलने प्रवास करीत निरोगी आरोग्यासाठी सायकल रायडिंगचे महत्त्व पटवून देत आहेत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News