#बेगडी

शुभांगी पवार, सातारा
Friday, 13 September 2019

बेगडी रूपाचे मुखवटे मानवा
किती दिवस आहे ओढणार
स्वतःच असलेलं अस्तित्व
खरचं तोच एकदिवस खोडणार

माणूस बनलाय हल्ली
भलताचं की हो साव
ज्याच्याकडे असेल पैसा
त्यालाच मिळतो खूप भाव...!!१!!

स्वच्छ, निखळ अंतःकरण
शोधून सुद्धा सापडणार नाही
खरं "स्वरूप" मानवाचं 
शोधावं लागेल दिशा दाही...!!२!!

बेमुर्वत वर्तन, बेगडी मुखवटे
लेवून सारे जण फिरती
ह्या असह्य हाहाकाराला
कंटाळली आहे ती धरती...!!३!!

बेगडी रूपाचे मुखवटे मानवा
किती दिवस आहे ओढणार
स्वतःच असलेलं अस्तित्व
खरचं तोच एकदिवस खोडणार...!!४!!

खरचं मनुजा तुझं तुला
थोडं तरी हित कळायला हवं
तुझं ओढलेलं "बेगडी स्वरूप"
तूच स्वतः खोडायला हवं...!!५!!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News