गुराखी तरुणावर बिबट्याचा हल्ला; मित्रांने वाचवला जीव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019
  • तरुण नेहमी प्रमाणे आपल्या बकऱ्या चारण्यासाठी पार्डी शिवारात गेलेला
  • अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविला
  • हनुमान व्यवहारे व नितीन लठाड यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला

जानेफळ : बकर्‍या चारण्यासाठी शेतात गेलेल्या तरुणावर बिबट्याने झडप घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सोबतच्या दोन मित्रांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला तर यात तो तरुण जखमी झाल्याची घटना आज (ता.5) सायंकाळी मेहकर तालुक्यातील पार्डी शिवारात घडली आहे.

लक्ष्मण सहदेव शिंदे (वय17) हा तरुण नेहमी प्रमाणे आपल्या बकऱ्या चारण्यासाठी पार्डी शिवारात गेलेला असताना सायंकाळी पाठीमागून अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविला, त्याने आरडाओरडा केल्याने बाजूच्या शेतात बकरऱ्या चारत असलेल्या मित्र हनुमान व्यवहारे व नितीन लठाड यांनी धाव घेतल्याने बिबट्या पळून गेला. मात्र यात लक्ष्मण सहदेव शिंदे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत त्याला गावातील नागरिकांनी येथील प्रा. आ. केंद्रात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी प्रवीण निकस यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ मेहकर येथे पाठवण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News