दोषीला जिवंत जाळून मृत्यूच्या दारात सोडा  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 February 2020

भारत हा लोकशाहीचा देश आहे म्हणजे कोणाला काही करण्याची सूट किंवा मनात येईल तसं वागायचं असं होत नाही. महाराष्ट्राची संस्कृती पर स्त्रीला मातेप्रमाणे, बहिणीप्रमाणे पाहिल जात अशी आहे.  पण आजकाल काही पुरुष वर्ग स्त्रीला उपभोग घेण्याचे साधन समजतात. पहिल्या काळात प्रेमाच्या विरहात प्रेमी वेडे व्हायचे आणि आपल्या प्रियकराच्या आठवणीत आयुष्य घालून द्यायचे  पण  आता एकतर्फी प्रेम करणाऱ्यांची हिंमत इतकी वाढली आहे की,  त्यांना ना समाजाची,  ना शासनाची भीती आहे. ते आपले मनमर्जी करण्यासाठी समोरच्याचा जीव घ्यायला घाबरत नाही.

समोरच्याच आयुष्य बिघडवायचं असतं फक्त तसा काही प्रकार हिंगणघाट प्रकरणी घडलाय. आज आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची वेळ आहे. बाकीच्या राष्ट्रांमध्ये ज्याप्रमाणे गुन्हा कराल तशीच शिक्षा दिली जाते. "जैसी करनी वैसी भरनी" त्याच प्रकारे आपल्याही भारत देशात अशा शिक्षा देणे कायद्याने मंजूर केल्या पाहिजे.

माझी  शासनाकडून आणि कायद्याकडे एकच मागणी आहे. हिंगणघाट प्रकरणातील दोषी देखील त्याच वेदना, पीडा, दु:खातुन गेला पाहिजे त्यालाही जिवंत जाळून मृत्यूच्या दारात सोडलं पाहिजे. आज भारताला हे करणं गरजेच आहे. हे प्रकरण हिंगणघाटमध्ये घडले पुढे दुसरीकडे कुठे घडू नये त्याकरता शासनाला कडक धोरण राबवावे लागेल. आता मेणबत्ती धरून रस्त्यावर चालण्याचा, अन्यायासाठी धरणे धरायचा काळ संपला. आता वेळ आहे काही करून दाखवायची आणि हे आता झालं नाही तर मला माझा देश सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम् दिसणार नाही. 

- कपिल देवरे, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News