जाणून घ्या; काय आहेत शिक्षकांच्या जबाबदाऱ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020
  • अनेकांनी फक्त गृहिणीपद नाखुशीने स्वीकारले आहे. या साऱ्यांना अनेक शाळांत असलेल्या कम्प्युटर लॅबमध्ये सन्मानाने काम उपलब्ध आहे.

डीटीएड व बीएड केल्याशिवाय या क्षेत्रात प्रवेश नाही, अशी आपली ठाम समजूत. त्यातच त्यांच्या पगाराबद्दल साऱ्यांची नाराजी दूर केल्यावर काय लक्षात येते? आज अनेक बीसीए, बीसीएस, नोकरी नसणारे कम्प्युटर इंजिनीअर व डिप्लोमा होल्डर आहेत

डीटीएड व बीएड केल्याशिवाय या क्षेत्रात प्रवेश नाही, अशी आपली ठाम समजूत. त्यातच त्यांच्या पगाराबद्दल साऱ्यांची नाराजी दूर केल्यावर काय लक्षात येते? आज अनेक बीसीए, बीसीएस, नोकरी नसणारे कम्प्युटर इंजिनीअर व डिप्लोमा होल्डर आहेत. यातील महिलांची संख्या प्रचंड आहे. अनेकांनी फक्त गृहिणीपद नाखुशीने स्वीकारले आहे. या साऱ्यांना अनेक शाळांत असलेल्या कम्प्युटर लॅबमध्ये सन्मानाने काम उपलब्ध आहे.

याच्यानंतरचा टप्पा म्हणजे गणिताच्या व सायन्सच्या पर्सनल ट्यूशन्स. प्रथम शाळेत शिरकाव, मुलांच्या आदरातून, त्यांच्या अडचणींवर तोडगे काढणारा टीचर अगदी तिसरी व सातवीपर्यंत अडणारे, पालकांच्या डोळ्यांत पाणी आणणारे गणित शिकवून लाडका शिक्षक बनतो. अशाला जोड देता येते, ती छोट्या छोट्या गणिती व्हिडिओची. खान अॅकॅडमीचे व्हिडिओ माहिती असलेले पारंपरिक शिक्षक अक्षरशः शोधावे लागतात, असा माझा अनुभव आहे; पण ज्यांना या खानची खाण सापडली आहे, त्यांचेच नव्हे, तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे आयुष्य ते बदलत आहेत. इतर 'दबंग'गिरीत अडकले आहेत.

महाराष्ट्राबाहेरील अनेक टीचर आज मिडल ईस्ट, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इथल्या मुलांना इंटरनेटवरून होम ट्युशन्स देत आहेत व अक्षरशः शेकडो डॉलर्स कमावत आहेत, हे आपल्याला माहितीही नाही; पण त्यासाठी तिथल्या पुस्तकातील कंटेट व त्यांच्या रिलर्निंग पद्धती माहीत करून घेण्याची प्राथमिक गरज आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News