इतिहास व पुरातत्व शास्त्रामध्ये करिअर करण्यासाठी जाणून घ्या या गोष्टी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020
  • प्रागैतिहासिक इतिहास म्हणजे तो कालखंड जेंव्हा इतिहास संशोधनाचे लिखित पुरावे उपलब्ध नाहीत. हा कालखंड किती असावा? साधारणतः १५ लक्ष वर्षांपासून ते इसविसनपूर्व ४०,००० वर्षांपर्यंत. ४०००० वर्षांपूर्वी मानवाचा पहिला वंशज जन्माला आला.

प्रागैतिहासिक इतिहास म्हणजे तो कालखंड जेंव्हा इतिहास संशोधनाचे लिखित पुरावे उपलब्ध नाहीत. हा कालखंड किती असावा? साधारणतः १५ लक्ष वर्षांपासून ते इसविसनपूर्व ४०,००० वर्षांपर्यंत. ४०००० वर्षांपूर्वी मानवाचा पहिला वंशज जन्माला आला. ४०,००० वर्षानंतर काही स्थळे, अवशेष यांच्या बाबतीत काही  पुरावे मिळतात. हा एवढा संपूर्ण कालखंड जीवाश्म आणि अवशेष यांच्या माध्यमातून शोधावा लागतो. अतिशय आव्हानात्मक आणि तुम्हाला आजच्या जगापासून थेट विश्वाच्या उत्क्रांतीपासूनच्या कालखंडात घेऊन जाणारे हे क्षेत्र अतिशय इंटरेस्टिंग आहे.

प्राचीन इतिहास हा साधारणतः माणूस भटकंती करू लागला, एका ठिकाणी वसू लागला तिथपासून ते थेट इसवीसनाच्या सातव्या ते दहाव्या कालखंडा पर्यंतचा. अर्थात हा ढोबळ हिशोब. या काळात संपूर्ण जगात अनेक अनेक घटना घडल्या आहेत. अनेक बदल झाले आहेत. काही आमुलाग्र. अशी माणसे जन्माला आली ज्यांनी जग बदलले. राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक सर्वच बाबतीत प्रचंड उलथापालथ झाली. माणसाच्या आयुष्यात स्थिरता आली. माणसाला अनेक प्रश्न पडले. त्यांची उत्तरे त्याने शोधण्याचा पर्यंत केला. हे सर्वच अतिशय उत्कंठावर्धक आहे. हि उत्कंठा इतर कुठलेही करिअर क्वचित देत असतील. इजिप्त मधील पिरामिड, चीनची भिंत भारतातील ताजमहाल, रोमन आणि ग्रीक साम्राज्ये, भरतील अनेक राजांच्या राजवटी, बौद्ध धर्माचा उदय आणि प्रसार अशा अनेक गोष्टी या कालखंडात घडल्यात. हा इतिहासाचा सर्वाधिक बिझी कालखंड मानता येईल. त्यामुळे तुम्हाला तुमचे दिवस रोमांचित करायला याहून अधिक सुंदर करिअर पर्याय नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News