मधाचे काही गुणकारी फायदे, जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 December 2019

आपल्याला अनेक आजारांपासून मधाचे सेवन केल्याने आपला बचाव होऊ शकतो. असेच आज आपण मधाचे काही गुणकारी फायदे जाणून घेणार आहोत.

आपल्याला आपल्या त्वचेची आणि शरीराची काळजी घेतली पाहिजे. आपण कधी ना कधी हे ऐकलं असेलच, सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. तसेच वजन कमी करण्यास सुद्धा मदत करते. कोमट पाणी पिण्याचेही खूप फायदे आहेत, तसेच मध ही किती गुणकारी आहे हे आपल्याला माहितच आहे. आपल्याला अनेक आजारांपासून मधाचे सेवन केल्याने आपला बचाव होऊ शकतो. असेच आज आपण मधाचे काही गुणकारी फायदे जाणून घेणार आहोत.

1.पोट साफ न होणे

आजकाल कामांमुळे आपलं खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं. कधी मिटींग्स तर कधी खूप काम असेल की जेवणाचा वेळ निघून जातो कळतच नाही. त्यामुळे अॅसिडीटी, पोट साफ न होणे, पटन क्रिया मंदावणे यामुळे मूळव्याधीचा त्रास होतो. पण जर रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून घेतले तर तुम्ही ह्या आजारांपासून दूर राहाल. आणि तुमची पोट साफ न होण्याची समस्या दूर होईल. तसेच कुठल्याही प्रकारच्या पोटात होणाऱ्या इन्फेक्शनपासून आपले संरक्षण होते.

2. गर्भवती स्त्रियांना मधाचा उपयोग 

गर्भवती स्त्रीने जर गर्भावस्थेमध्ये मधाचे नियमित सेवन केले तर, तिचे होणारे बाळ हे निरोगी आणि मानसिकदृष्ट्या चांगले असते.
त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी आवर्जून मधाचे सेवन करावे.

3. चेहरा निस्तेज राहतो

तरुण मुलींना नेहमी वाटतं की आपला चेहरा निस्तेज असावा, त्यावर पिंपल्स किंवा दाग नसावे. यासाठी त्वचा सुंदर ठेवायची असेल तर लिंबू हा खूप फायदेशीर आहे. यातले तत्व रक्ताला शुद्ध करण्यासाठी मदत करतात. तसेच मध हे चेहऱ्याला तरुण ठेवण्यास मदत करतो. 

4.उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो

लसूण आणि मध ह्यांचे एकत्र मिश्रण केल्याने उच्च रक्तदाब सामान्य होण्यास मदत होते. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्यांनी ह्याने सेवन जरुर करावे. 

5. तोंडाची दुर्गंधी दूर होते

आपण कोठे बाहेर जातो किंवा मिटींग्सला आणि जर तोंडातून वास येत असेल तर समोरचा व्यक्ती प्रतिक्रिया देतो तर आपल्याला त्याची लाज वाटते. तोंडाचा वास दूर करण्यासाठी लिंबू, मध आणि गरम पाणी ह्या तीन गोष्टी मदत करतात. लिंबूमुळे तोंडातील ग्रंथी सक्रिय होतात आणि बॅक्टीरियाला नष्ट करुन तोंडाला शुद्ध करते. त्यामुळे तोंडाचा वास येत नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News