संधी लाभते तेवढे शिका व स्वतःच्या पायावर उभे रहा :  नीलेश काब्राल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना त्यात रस दाखविला पाहिजे. शिक्षण घ्‍यायचे म्हणून घेऊ नका, शिक्षणात वयोमर्यादा नसते. त्यासाठी जेवढे शिकायची संधी लाभते तेवढे शिका व स्वतःच्या पायावर उभे रहा. आज पूर्वीचे शिक्षण राहिलेले नाही. संगणक युगात प्रवेश केलेला आहे. त्या धर्तीवर चांगले काम करून दाखवा,

कुडचडे : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना त्यात रस दाखविला पाहिजे. शिक्षण घ्‍यायचे म्हणून घेऊ नका, शिक्षणात वयोमर्यादा नसते. त्यासाठी जेवढे शिकायची संधी लाभते तेवढे शिका व स्वतःच्या पायावर उभे रहा. आज पूर्वीचे शिक्षण राहिलेले नाही. संगणक युगात प्रवेश केलेला आहे. त्या धर्तीवर चांगले काम करून दाखवा, असे कुडचडेचे आमदार तथा वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.

कुडचडे चंद्रभागा तुकोबा नाईक संकुलात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्‍या उद्‌घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्‍हणून ते बोलत होते. यावेळी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय नाईक, सीसीटिव्ही प्रधान साऊथ वेस्टपोर्ट जनरल मॅनेजर अँथोनी फर्नांडिस, मुख्याध्यापक वामनभद्री, नगरसेवक रूचा वस्त, चेअरमन हनुमंत वस्त, गोकुळदास गावकर, सुगंधा भट, नगरसेवक अर्पणा प्रभूदेसाई, राजेंद्र नाईक, दिव्या नाईक, गुरूनाथ नाईक, नूतन कोलवेकर, लिन्डा रिबेलो, स्‍मिता नाईक, जतीन साळगावकर, समाजसेवक गणपत नाईक उपस्थित होते.

मंत्री काब्राल म्हणाले की, पूर्वी सीसीटिव्हीसारखी उपकरणे शिक्षण क्षेत्रात नव्हती. आज सार्वजनिक ठिकाणी, चार रस्ता, महत्त्‍वाच्या ठिकाणी ते बसविण्यात आलेले आहेत. पण शाळेतील वर्गात सीसीटीव्ही बसविण्याचा हा पहिलाच उपक्रम कुडचडेतील चंद्रभागा तुकोबा नाईक विद्यालयात घडवून आणल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या कामात संजय नाईक व अँथोनी फर्नांडिस यांनी चांगल्या कामासाठी मदत केलेली आहे. विद्यार्थ्यांवर या माध्यमातून कार्यालयात बसून मुख्याध्यापक लक्ष देऊ शकतो तसेच शिक्षकांच्या कामगिरीचाही आढावा घेण्यात सहज शक्‍य होणार आहे. परीक्षा काळात चालणारा गोंधळही कमी होणार आहे. आज शिक्षण क्षेत्रात उच्च भरारी घेऊन आपल्या राज्याबरोबरच देशासाठी नाव कमाविण्याची संधी आहे. त्या संधीचा फायदा उठवा. आपल्या आईवडीलांबरोबरच शिक्षकांचाही आदर करायला शिका. मुलांनी चांगले शिक्षण घेऊन समाजात नाव कमवावे अशी अपेक्षा प्रत्‍येक पालकाची असते. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. ते सार्थ करून दाखवा, असे काब्राल म्हणाले.

यावेळी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय नाईक यांनी सांगितले की, कुडचडेतील चंद्रभागा तुकोबा नाईक शाळेचे नाव अभिमानाने घेतले जात आहे. त्याची प्रतिमा राखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. आज संपूर्ण संकुलातील क्‍लासरूम, लॅबोरेटरी, वाचनालय कक्ष यासारख्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर बसविण्यात आले आहेत. या कामासाठी सुमारे दोन लाख रू. खर्च आला असून माझ्यासोबत साऊथ वेस्टपोर्टचे जनरल मॅनेजर अँथोनी फर्नांडिस यांनीही या कामासाठी सढळ हस्ते मदत केलेली आहे. आज शिक्षणाला महत्त्‍वाचे स्थान आहे. शिक्षणावर व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर बारकाईने लक्ष देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाकडे भर दिला पाहिजे. अनेक विद्यार्थी गरिबीवर मात करून आपले शिक्षण पूर्ण करण्याच्या हेतूने येतात व त्यात ते यशस्वी होतात. त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी पालक कोणतीच कमतरता भासू देत नसतात याचा विचार प्रत्येक विद्यार्थी वर्गाने केल्यास कोणत्याही परिस्थीतीवर मात करता येते.
चंद्रभागा तुकोबा नाईक विद्यालयाला राज्यातील इतर विद्यालयांच्या तुलनेत उच्च पदावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्‍वासन संजय नाईक यांनी दिले. सूत्रसंचालन शिक्षिका श्रीदेवी यांनी केले. आभार प्रा. वामन भद्री यांनी मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News