कशी असते वैद्यकीय क्षेत्रातील निवड प्रक्रिया जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 January 2020

प्रत्येक संवर्गात दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्यास त्यांचा गुणवत्ता यादीतील क्रमांक तसेच निवड झालेल्या प्रत्येक अभ्यासक्रमाच्या उमेदवारास दरमहा ५०० रुपये विद्यावेतन दिले जाते.

प्रत्येक संवर्गात दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्यास त्यांचा गुणवत्ता यादीतील क्रमांक पुढीलप्रमाणे निश्चित केला जातो.

बीएस्सी (ऑनर्स)- नर्सिंग- जीवशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारास वरचा क्रमांक दिला जाईल.

(बीएस्सी पॅरामेडिकल अभ्यासक्रम प्रवेश – गणित विषयात सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारास वरचा क्रमांक दिला जाईल.) या पद्धतीचा अवलंब केल्यावरही समान गुण राहिल्यास, भौतिकशास्त्र विषयात अधिक गुण मिळालेल्या उमदेवारास वरचा क्रमांक दिला जाईल. तरीही समान गुण राहिल्यास, रसायनशास्त्र विषयात अधिक गुण मिळालेल्या उमेदवारास वरचा क्रमांक दिला जाईल. त्यानंतरही समान गुण राहिल्यास, दोन उमेदवारांपकी वयाने मोठय़ा असलेल्या उमेदवारास वरचा क्रमांक दिला जाईल.

बीएस्सी (पोस्ट बेसिक)- नर्सिंग- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची परीक्षा दिल्लीमध्येच घेतली जाईल. यामध्ये केवळ इंग्रजी विषयाचाच पेपर असेल.

गुणवत्ता यादीमध्ये एकूण जागांच्या तीनपट उमेदवारांचा समावेश केला जातो. अंतिम निवड यादी तयार करण्याआधी मुलाखत किंवा उमेदवारांचे मूल्यांकन केले जाईल. यासाठी उमेदवारांची बारावीपर्यंतची शैक्षणिक कामगिरी, नर्सिंग परीक्षेतील कामगिरी आणि प्रत्यक्ष नर्स म्हणून केलेली कामगिरी या बाबींचा समावेश आहे. या टप्प्याला ३० गुण दिले जातील. निवड झालेल्या प्रत्येक अभ्यासक्रमाच्या उमेदवारास दरमहा ५०० रुपये विद्यावेतन दिले जाते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News