निरोगी शरीराचा आहार जाणून घ्या

डॉ. शैलजा काळे, मधुमेह तज्ज्ञ
Monday, 8 April 2019

सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी आहार महत्त्वाचा असतो. आहारातून मिळणाऱ्या पोषक द्रव्यांवर आपल्या शरीराचा विकास होतो. तो आहार समतोल असणे आवश्‍यक असते. समतोल आहार म्हणजे नक्की काय, असा प्रश्‍न आपल्याला पडतो. आपण रोज घेत असलेल्या आहारात कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ किंवा स्निग्धे असतात.

सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी आहार महत्त्वाचा असतो. आहारातून मिळणाऱ्या पोषक द्रव्यांवर आपल्या शरीराचा विकास होतो. तो आहार समतोल असणे आवश्‍यक असते. समतोल आहार म्हणजे नक्की काय, असा प्रश्‍न आपल्याला पडतो. आपण रोज घेत असलेल्या आहारात कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ किंवा स्निग्धे असतात. या प्रत्येकाचा योग्य प्रमाणात समाविष्ट करणे, याला समतोल आहार म्हटले जाते. भारतीयांमध्ये जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण हे विदेशी लोकांच्या तुलनेत खूप जास्त असते. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या आहारात असलेला अतिरिक्त कर्बोदकांचा समावेश.

राज्य कोणतेही असो, पण तेथील आहारात कर्बोदके जास्त असतात. सामान्यतः भारतीय आहारात खूप विविधता आढळते. त्यातून आहारातील असमतोल निर्माण होतो. आपण आहारात कर्बोदके सर्वाधिक घेतो. त्या पाठोपाठ अतिरिक्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात. प्रथिनांचे प्रमाण सगळ्यांत कमी असते. त्यामुळे आपल्या आहारात ६५ टक्के कर्बोदके, २० टक्के स्निग्ध पदार्थ आणि १५ टक्के प्रथिने असतात. आहाररचनेत काही महत्त्वाचे बदल स्वीकारून आहारातील असमतोल निश्‍चित कमी करता येतो. 

कर्बोदके  :आहारातील बहुतेक भाग कर्बोदकांचा असतो. धान्य, कडधान्य, भाज्या, फळे यातून आपल्या शरीराला त्याचा पुरवठा होतो. जेवणानंतर रक्तातील वाढलेल्या साखरेचे प्रमाण कर्बोदकांवर अवलंबून असते. त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या आहारात त्याचे विशेष महत्त्व आहे. 
प्रथिने : शरीराची वाढ, कार्यक्षमता टिकविणे, स्नायूंची मजबुतीसाठी शरीराला प्रथिनांची गरज असते. 

स्निग्ध पदार्थ :वेगवेगळ्या प्रकारची तेल, तेलबिया, कठीण कवचाची फळे यांतून शरीराला स्निग्ध पदार्थ मिळतात. फळे व भाज्यांमध्ये याचे प्रमाण कमी असते. शरीरातील चयापचय क्रियेस योग्य प्रमाणात स्निग्ध पदार्थ गरजेचे आहेत. पण, याच्या अतिरिक्त सेवनामुळे रक्तातील चरबीयुक्त कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइडसारख्या शरीरास घातक द्रव्यांचे प्रमाण वाढते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News