मधुमेह कमी करण्यासाठी हे करा

मेघश्‍याम भोर
Thursday, 4 April 2019

माझे वजन गेल्या वर्षी मार्च महिन्यात ९२ किलो होते. विशेष म्हणजे, मला वयाच्या २८व्या वर्षी मधुमेह झाला आणि मी हादरून गेलो. त्यानंतर मी डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाचा व्हिडिओ इंटरनेटवर पाहिला. या अभियानात काम करणारे आमच्याच गावचे डॉ. संतोष ढुमणे यांच्या मार्गदर्शनानुसार डाएट प्लॅन सुरू केला. त्यापूर्वी मी दिवसभरातून चार-पाच वेळा खात होतो. त्यामुळे, दिवसातून दोनच वेळेस जेवायचे म्हटल्यावर, मला सुरवातीला आठ-दहा दिवस अवघड गेले.

मात्र, मला हळूहळू सकाळी जेवल्यावर संध्याकाळीही भूक लागणे कमी झाले. मी सध्या सकाळ- संध्याकाळ या दोनच वेळेत जेवतोय. इतर वेळेस फक्त पाणीच! मी दररोज पहाटे ५० मिनिटे चालणे व दोनदाच ५५ मिनिटांत खाणे या दोनच गोष्टी गेल्या गुढीपाडव्यापासून करतोय. तेव्हापासून मला खूप चांगले परिणाम मिळाले.

आता माझे वजन ८३ किलो असून, ते जवळजवळ ९ किलोने कमी झाले आहे. कंबरेचा घेरही ५ इंच कमी झाला आहे. माझे HbA१c ९.७ वरून ६ वर आले आहे. माझे गेल्या तीन महिन्यांतील रक्तातील सरासरी ग्लुकोज २४० वरून १२५ वर आले आहे. जीवन जगण्याची नवी दृष्टी दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News