चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलेल्या आर्मस्ट्रॉंग यांना घेऊन जाणाऱ्या अपोलो-11 यानाची जाणून घ्या कहाणी...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 July 2019

1961 मध्ये जगातलं पहिलं शीतयुध्द झालं, त्याचवेळी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यातला वाद शिगेला पोहोचला होता. त्यातच सोव्हिएत युनियन यांनी अंतराळात पहिला मानव पाठला आणि त्यापाठोपाठ कमीपणा न मानणाऱ्या अमेरिका देशानेही एक महत्वाची घोषणा केली. 

1961 मध्ये जगातलं पहिलं शीतयुध्द झालं, त्याचवेळी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यातला वाद शिगेला पोहोचला होता. त्यातच सोव्हिएत युनियन यांनी अंतराळात पहिला मानव पाठला आणि त्यापाठोपाठ कमीपणा न मानणाऱ्या अमेरिका देशानेही एक महत्वाची घोषणा केली. 

त्यावेळेचे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी अमेरिकेकडून पहिली चंद्र मोहिमेची माहिती दिली आणि 'वी चूज टू द मून' ची घोषणा केली.

अंतराळतल्या चढाओढीमुळे निश्चितच अमेरिका काळजीत होती, मात्र अपोलो-11 च्या यशस्वी घोषणेनंतर आणि त्याच्या योग्य नियोजनामुळे सुरू झालेल्या कामकाजानंतर अमेरिकेने चंद्रावर पहिलं पाय ठेवणं आपलं ध्येय समजलं. अपोलोच्या अंतर्गत 17 मोहिमांचं नियोजन, 4 लाख लोकांचे कामकाज आणि 25 बिलियन डॉलर्सचा खर्च अमेरिकेला एक नवी ओळख करून देणार होती. 

अपोलो-11 मोहिमेसाठी 3 अंतराळवीरांची निवड करण्यात आली. बझ ऑल्ड्रिन, नील आर्मस्ट्राँग आणि मायकल कॉलिन्स. 19 जुलै 1969 रोजी मोहिमेला सुरूवात झाली. सॅटर्न -5 या शक्तीशाली रॉकेटने अपोलो-11 चे कमांड आणि सर्विस मॉड्यूल वाहून नेण्याचं काम केलं. 

नील आर्मस्ट्राँग आणि  बझ ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर उचरायचं तर त्याच वेळी कॉलिन्स यांनी कमांड आणि सर्व्हिस  मॉड्यूल सांभांळाये काम बजावले. त्यामुळे चंद्रावर पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्राँग हे पहिले तर बझ ऑल्ड्रिन ये जगातले दुसरे व्यक्ती ठरले. 

1969 आधी अपोलो-11 ची पहिली चाचणी 1967 मध्ये घेण्यात येणार होती, मात्र उड्डानाआधीच तपासणी दरम्यान दुर्घटना झाली आणि त्यावेळी चंद्र मोहिमेसाठी निवड करण्यात आलेल्या तीन आंतराळवीरांचा मृत्यू झाला होता.

1969 मध्ये अंतराळ मोहिम राबवताना 1967 च्या अपघाताप्रमाणेच अडचणी येऊ लागल्या होत्या, मात्र धोक्याची घंडा असूनही 110 तासांचा प्रवास करत 20 जुलै रोजी अपोलो-11ने तीघांना घेऊन चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News