स्वातंत्र दिनी लावा कंपनीचे प्राउडली इंडीया स्पेशल फोन लॅंच होणार; जाणून घ्या फिचर्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020

हे स्मार्टफोन विशिष्ट कालावधीसाठी असतील, या हँडसेटच्या मागे भारतीय तिरंग्याचे तीन रंग सर्वात वर नारंगी, मध्ये पांढरा, शेवटी हिरवा राहणार आहे. त्याखाली प्राऊडली इंडीया असे असे लिहिण्यात आले आहे.

मुंबई : भारतीय स्मार्टफोन लावा कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आली. भारतीय स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२०  रोजी लावा झेड ६१ प्रो, लावा ए५ आणि लावा ए9 ही तीन विशेष हँडसेट लॉन्च करणार आहे. हे स्मार्टफोन विशिष्ट कालावधीसाठी असतील, या हँडसेटच्या मागे भारतीय तिरंग्याचे तीन रंग सर्वात वर नारंगी, मध्ये पांढरा, शेवटी हिरवा राहणार आहे. त्याखाली प्राऊडली इंडीया असे असे लिहिण्यात आले आहे. हा हँडसेट कंपनीने जुलै महिन्यात तयार केला होता. तो १५ ऑगस्ट रोजी लॉन्च केला जाणार आहे. 

हँडसेटचे फिचर्स

LAVA Z61

लावा झेड६१ हा स्मार्टफोन ५ हजार ७७७ रुपयाला ग्राहकांना मिळणार आहे. त्यामध्ये २ जीबी रॅम आणि १७ जीबी इंटरनल मेमरी स्टोअरेज देण्यात आले.  एक मायक्रो एसडी कार्ड टाकून स्टोरेज वाढवण्याची सोय करण्यात आहे. या स्मार्टफोनचा गोल्ड कलर, आणि पाठीमागे तिरंगा आहे. त्यावर प्राउंड ऑफ इंडिया असं लिहिलेल आहे. स्मार्टफोनचा डीसप्ले एचडी ५.४५ इंच आहे. एस्पेक्ट रेशो १८: ९ आहेत. १.६ Hz ऑक्टकोयर प्रोसेसर देण्यात आले आहेत. फोटो काढण्यासाठी ८ रिअर मेगाफिक्सल कॅमेरा आणि ५ फर्न्ट मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्ट फोनची बॅटरी 3 हजार १०० एमएएच आहे.

Lava A9 

या फोनमागे तिरंगा कलर आहे. Lava A9 या फोनची १ हजार ५७५ रुपये आहे. ४ जीबी रॅम आणि एफएम दिला आहे. २.८ इंच डिस्प्ले आणि  १ हजार ७०० एमएएच बॅटरी देण्यात आली. एक वेळा चार्जिक केल्यावर ६ दिवस बॅटरी टिकणार आहे. याची मेमरी ३२ जीबी पर्यांत वाढवता येणार आहे. हेडफोन आणि ब्लूटूथ सिस्टम देण्यात आली. 

Lava A5

Lava A5 मोबाईलची किंमत्त १ हजार ३३३ रुपये आहे. १ हजार एमएएच बॅटरी, ०. ३ रियर मेगापिक्सल कॉमेरा देण्यात आला आहे. एकदा चार्जिंग केल्यानंतर तिन दिवस बॅटरी चालेल. काही दिवसात तिन स्मार्टफोन फ्लिपकार्ड आणि इतर ई- कॉमर्स संतेकस्थळावर उपलब्ध होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News