लाजणं...

अभिनव ब. बसवर
Wednesday, 27 February 2019

याआधी तिला लाजलेलं कधी पाहिलंच नव्हतं. नूसते भांडायचो. सततची चेष्टा मस्करी. लाजणं वगैरे कधी अनुभवायलाच नाही मिळालं. मनात बर्याच दिवसांपासून होतं, कि तिला प्रोपोज करावं. रूमवरून निघताना अगदी ठरवून निघायचो, कि आज काहीही झालं तरी तिला एकदाचं विचारून टाकायचं. मँडम समोर आल्या कि मात्र तोंडातून एकही शब्द फुटायचा नाही. ती हो म्हणेल अशी मनात कुठेतरी खात्री होतीच. तसा स्वतःवर कॉन्फिडन्स होता माझा पण का कुणास ठाऊक पुरती घाबरगुंडी उडायची...

याआधी तिला लाजलेलं कधी पाहिलंच नव्हतं. नूसते भांडायचो. सततची चेष्टा मस्करी. लाजणं वगैरे कधी अनुभवायलाच नाही मिळालं. मनात बर्याच दिवसांपासून होतं, कि तिला प्रोपोज करावं. रूमवरून निघताना अगदी ठरवून निघायचो, कि आज काहीही झालं तरी तिला एकदाचं विचारून टाकायचं. मँडम समोर आल्या कि मात्र तोंडातून एकही शब्द फुटायचा नाही. ती हो म्हणेल अशी मनात कुठेतरी खात्री होतीच. तसा स्वतःवर कॉन्फिडन्स होता माझा पण का कुणास ठाऊक पुरती घाबरगुंडी उडायची...

मुव्हीज मध्ये पाहायला एकदम छान वाटतं बरं का, प्रोपोज केल्या केल्या ती ओठांवर हलकीशी कीस करून जाते. इथे खर्या आयुष्यात कुठली कीस आणि कसलं काय. आजपर्यंत बर्याचवेळा मी तिला प्रोपोज करण्याचा प्रयत्न करून पाहिलाय. डावा पाय थरथर कापायलाच लागतो. कितीही आँल इज वेल म्हटल तरी काहीच वेल नसतं. सगळ्या अंधश्रद्धा आहेत या..

माझी तडफड तिच्या मैत्रीणींना अगदी स्पष्ट दिसायची. मजा घेण्याची एकही संधी त्या सोडायच्या नाहीत. माझा पचका झाला कि पोटात चिमटे घ्यायला मात्र या सगळ्याजणी पुढे. फट्टू आहेस म्हणे तू. मैत्रीण म्हणून तिच्यासोबत मी फारच कम्फर्टेबल असलो तरी, 'मला तू आवडतेस', हे इतकंस सांगणंं माझ्यासाठी अवघड होऊन बसलेलं. हि शहाणी पण इतकी हुशार ना, चेहऱ्यावर किंचितसं देखील जाणवू द्यायची नाही...

रूमवर येऊन अतिफ आणि अरजित चे गाणे लावले कि मित्र पहिले लाथ घालायचे. प्रेमवीर तुम्ही अगोदर बाहेर व्हा म्हणायचे. ‘तेरा होणे लगा हु, जबसे मिला हु’, हे दस्तुरखुद्द माझ्या स्वतःच्या कर्कश आवाजात ऐकणं त्यांच्या फार जीवावर यायचं. एकवेळ देवदास परवडला पण मजनू नको अशी अवस्था झालेली. ‘तुला ती का आवडते. असं काय पाहिलं तिच्यात ?’, हे मित्रांचे हमखास प्रश्न. आता यांना काय सांगू, कि तिच्यात काय काय पाहिलं...

असं मात्र अजिबात नाही कि, ती दिसायला सुंदर, वेल मेंटेन्ड आहे म्हणून मला आवडते. आमचं छान पटतं. भांडत असलो तरी पटतं. बर्याचदा एकमेकांचे मुद्दे पटलेले असूनही मुद्दामून आम्ही एकमेकांवर डाफरतो. भांडलं कि तेवढीच जास्त जवळ येते ती.

आजमात्र ठरवून टाकलं कि तिला विचारायचं. जे कांही होईल ते बघून घेऊ. लंचसाठी क्यानटीन मध्ये बसलेलो. बराचवेळ मी काहीच बोलेना त्यामुळे तिनेच बडबड करायला सुरुवात केली. तरीही मी शांत. ‘काय झालं, एनी प्रोब्लेम ?’, असं तिने विचारलं तरी मी शांतच.

आता मात्र तीदेखील शांत बसली. जेवण झाल्यानंतर तिने लिंबू सरबत देखील मागवला. मला पिणार का विचारल्यानंतर मी गुपचूप तो ग्लास घेतला. सगळी ताकद लावली आणि डिरेकटली सांगून टाकलं, ‘मला तू आवडतेस.’ डोळे बारीक करून तिने माझ्याकडे पाहिलं. मी गटगट सरबत पिऊन घेतला. हळूच तिच्याकडे पाहिलं, तर अक्षरशः लाजत होती ती. आजमात्र हे लाजणं देखील अनुभवलं... कातील......

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News