शेवटी उरलो मी एकटाच

सोनवणे बी
Tuesday, 27 August 2019

असा कसा बदलला काळ
अर्थ जीवनाचा नाही उरला,
धिनगी लावली कुणीतरी 
एकटाच आयुष्याला पुरला

 

तुझाचं हात माझ्या हाती
श्वास श्वासात एकवटला,
संकटे त्सुनामी वादळांची 
त्या भोव-यात भरकटला

जीवपाड प्रेम माझ्यावर
थाटलेला होता तो संसार,
कर्दनकाळ कसा आला
जगणं ही झालंय लाचार

अवकळा अशी चिंतनाची
विसरूनं गेली सारे स्वप्नं,
एकदुस-यास दिले होते ते
वचन आता फक्त आठवण

असा कसा बदलला काळ
अर्थ जीवनाचा नाही उरला,
धिनगी लावली कुणीतरी 
एकटाच आयुष्याला पुरला

 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News