आयटीआय प्रवेशाची अंतिम संधी; आजच करा प्रवेश निश्‍चिती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 August 2020

विद्यार्थ्यांनी अर्जाची तारीख वाढवण्याची विनंती केल्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली.

मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) येत्या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली, मात्र विद्यार्थ्यांनी अर्जाची तारीख वाढवण्याची विनंती केल्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची शेवटची संधी मिळाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेला नाही त्यांनी या संधीचा लाभ मिळणार आहे.

2015- 2019 या शैक्षणिक वर्ष दरवर्षी 2.25 टक्के विद्यार्थी प्रवेश अर्ज करत होते, मात्र यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे फक्त 1.48 टक्के विद्यार्थी अर्ज भरले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची इच्छा असूनही विविध अडचणीमुळे विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास विलंब केला आहे कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आतापर्यंत एक लाख 45 हजार जागांसाठी दोन लाख 55 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला. आयटीआय प्रवेश अर्जाची सुरुवात 1 ऑगस्ट 2020 पासून सुरू झाली. राज्यातील 417 शासकीय आणि 569 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 84 प्रकारचे व्यवसायिक कोर्सेस शिकवले जातात. एकूण 6868 तुकड्यांमधून 1 लाख 45 हजार 632 विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. 

१९ ऑगस्ट पर्यंत 2 लाख 55 हजार 803 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले, त्यामधून 2 लाख 21 हजार 584 विद्यार्थ्यांनी अर्जाची फी भरली. आणि 2 लाख 7 हजार 285 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ओपशन दिला, मात्र 48 हजार 518 विद्यार्थी यांनी परीक्षा फी आतापर्यंत भरली नाही. राज्यात अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली, ग्रामीण भागात वीज, इंटरनेट अशा विविध समस्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती संचालनालयाने दिली आहे. 

समुपदेश आणि मार्गर्शन

आयटीआय प्रवेशाची सर्व माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रवेश प्रोत्साहन अभियान राज्यभर सुरू करण्यात आले. आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना समुपदेशन करून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांनी एक टीम नेमन्यात आली आहे. ऑनलाइन अर्जामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विभागस्तरावर मदत कक्ष निर्माण करण्यात आला.

विभाग     रिक्त जागा

अमरावती     17984 
औरंगाबाद     19244 
मुंबई            19948
नागपूर          28136 
नाशिक         29500
पुणे              30820 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News