मुंबई विद्यापीठात परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम संधी; उदय सामंत यांचे भावनीक आवाहन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 18 September 2020

18 सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षा फार्म भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावे असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

मुंबई : कोरोनामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहिले, वंचित विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून पुन्हा परीक्षा अर्ज भरण्याची संधी मुंबई विद्यापीठाने उपलब्ध करुन दिली आहे. 18 सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षा फार्म भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावे असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

गुरुवारी मुंबई विद्यापाठाच्या परीक्षा आयोजना संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील, उच्च व तंत्र विभागाचे अधिकारी आणि विद्यापीठाचे प्रमुख उपस्थित होते. राज्य सरकार विद्यापीठांना सर्व प्रकारे सहकार्य करेल, त्यामुळे विद्यापीठांनी काळजी करण्याचे कारण नाही असे मत पत्रकारांशी बोलताना सामंत यांनी व्यक्त केले. राज्यातील सर्वांधिक विद्यार्थी संख्या मुबई विद्यापीठाची आहे, एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहता काम नये, याचा विचार करुन विद्यापीठांनी परीक्षा आयोजित करावी, राज्य सरकर विद्यापीठाला लागेल ती मदत करेल असे सामंत यांनी सांगितले.

मुबंई विद्यापाठाची बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देणे शक्य नाही त्यांची ऑफलाईन परीक्षा देतली जाणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य परीक्षा घेण्यापुर्वी विद्यार्थ्यांकडून सराव पेपर सोडवून घेतले जातील, त्यामुळे ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही. मुंबई विद्यापीठाच्या प्रत्यक्षिक परीक्षा 15 सप्टेंबरपासून आहेत. तर 25 सप्टेंबरपासून अॅटीकेटीच्या परीक्षा सुरु होतील, मुंबई विद्यापीठाचे एकूण 2 लाख 47 हजार 500 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे, त्यापैकी 1 लाख 70 हजार विद्यार्थी रोगूलर तर 72 हजार 500 विद्यार्थी अॅटीकेटीचे आहे, असे सामंत यांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News